India vs Canda Row saam Tv
देश विदेश

India vs Canada Row: भारताचा खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात डबल स्ट्राइक

India vs Canada Row: भारतीय दूतावास आणि अन्य संस्थांमध्ये घुसून भारतीय मालमत्तेची नासधूस करणाऱ्या खलिस्तानी समर्थकांची खैर नाही. भारत सरकार लोकांवर डबल स्ट्राइकची योजना बनवलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

India vs Canda Row:

हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला. त्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. यामुळे भारत सरकारनं खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. (Latest Politics News)

परदेशात भारतीय मालमत्तेची नासधूस आणि हिंसक प्रदर्शन करणाऱ्या खलिस्तान्यांना भारत सरकार धडा शिकवणार आहे. या लोकांचे पासपोर्ट आणि ओव्हरसीज सिटिजन ऑफ इंडियाचे कार्ड रद्द करण्याचा प्लान सरकारनं आखलाय. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA)ने परदेशात बसलेल्या भारतातील इतर खलिस्तानी दहशतवाद्यांच्या मालमत्ता शोधून त्या जप्त करण्यात येणार आहे. या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने तपास यंत्रणांना परदेशात स्थायिक झालेल्या दहशतवाद्यांची मालमत्ता शोधण्यास सांगितलंय.

तसेच यूएस, यूके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये स्थायिक झालेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटवून त्यांना भारतात प्रवेश बंदी करावी. यासाठी त्यांचे भारताचे परदेशी नागरिकत्व (ओसीआय) रद्द करावे, असं भारत सरकारनं तपास यंत्रणांना सांगितलंय. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी खलिस्तानी पन्नूची चंदीगड आणि अमृतसर येथील मालमत्ता जप्त केल्यानंतर भारत सरकारनं ही योजना आणलीय.

सरकारच्या या निर्णयामुळे त्यांचा आर्थिक फंड रोखण्यास आणि त्यांना भारतात येण्यापासून रोखलं जाईल. परदेशातील भारतीय संस्था, दूतावासाच्या कार्यालयात तोडफोड तसेच हिंसक विरोध प्रदर्शन करणाऱ्यांची भारतीय पासपोर्ट आणि ओसीआय कार्ड रद्द केली जाणार आहेत. या लोकांची सर्व माहिती भारताच्या सर्व विमानतळांवर दिली जाणार आहे. मागच्या काही महिन्यात भारतीय दूतावासाबाहेर जी काही हिंसक विरोध प्रदर्शन झाली, त्याची सर्व माहिती कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि अन्य देशांना देण्यात आलीय.

दरम्यान भारत सरकारने यूएस, यूके, कॅनडा, यूएई, पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये राहणाऱ्या १९ फरार खलिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. यूके स्थित परमजीत सिंग पम्मा,कुलवंत सिंग मुथडा, सुखपाक सिंग, सरबजीत सिंग बेनूर,कुलवंत सिंग उर्फ ​​कांता, दुपिंदर जीत. पाकिस्तान स्थित वाधवा सिंग बब्बर उर्फ ​​चाचा,रणजीत सिंग नीता,गुरमीत सिंग उर्फ ​​बग्गा,गुरप्रीत सिंग उर्फ ​​बागी.

अमेरिकेतील जेएस धालीवाल, हॅरिएट सिंग उर्फ ​​राणा संग,हरजप सिंग उर्फ ​​जप्पी डिंग,अमरदीप सिंग पुरेवाल,एस हिम्मत सिंग, जस्मिन सिंग हकीमजादा (युएई) , गुरजंत सिंग धिल्लन, यय(ऑस्ट्रेलिया), जसबीतसिंग रोडे (कॅनडा),जतिंदर सिंग ग्रेवाल (कॅनडा), अशी त्यांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT