देश विदेश

Indian Student Crime News: UK मध्ये भारतीय विद्यार्थ्याचं लाजिरवाणं कृत्य; नशेत तरुणीला... घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

सदर घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे.

Ruchika Jadhav

Indian Student Arrested In UK: भारतीय रहिवासी असलेल्या एका २० वर्षीय विद्यार्थ्याला ब्रिटेनमध्ये अटक करण्यात आली आहे. अटक करत न्यायालयाने त्याला ६ वर्ष ९ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. एका तरुणीवर बलात्कार केल्या प्रयकरणी तरुणाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदर घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे. (Crime News)

तरुणाने पीडितेला आपल्या खांद्यावर घेतलं होतं. तरुणीला खांद्यावर घेऊन जातानाची दृश्य रस्त्त्यावरील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. कार्डिफ सीटी सेंटर येथून तरुण मुलीला घेऊन चालला होता. त्याने तरुणीला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तरुण रस्त्याने नशेत धुंद होत चालला होता. त्याला निट चालताही येत नव्हते.

साउथ वेल्स पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. रस्त्यावरील काही सीसीटीव्ही फुटेज त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. फुटेजमध्ये दिसत असलेला तरुण हा भारतीय असून त्याची ओळख पटली आहे. पोलिस तपासात त्याने स्वत: देखील या बाबत कबुली दिली आहे.

तरुणीही नशेत होती

सदर घटनेनंतर पीडितेने पोलिसांत या बाबात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत तपास सुरु केला. ब्रिटन पोलिसांनी यात म्हटलं आहे की, पीडिता त्या रात्री आपल्या मित्रांसह बाहेर फिरायला गेली होती. त्यावेळी तिने देखील दारु पिली होती. जेव्हा सर्वजण घरी निघाले तेव्हा तरुणीला फार शुद्ध नव्हती. त्याचा फायदा घेत तरुणाने तिला आपल्या घरी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कुणाच्या गळ्यात पडणार नगराध्यक्षपदाची माळ? VIDEO

Instant Idli Recipe : पीठ न आंबवता १० मिनिटांत बनवा मऊ-लुसलुशीत इडली, वाचा इन्स्टंट रेसिपी

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपचा डंका? कोणाचे किती नगरसेवक निवडून येणार?

Saam Maha Exit Poll : राज्यात भाजपच नंबर @1 ; राष्ट्रवादी, शिंदे सेनेला किती ठिकाणी सत्ता? ठाकरे-पवार गट, काँग्रेसची काय स्थिती?

Mumbai Water Cut : मुंबईवर ८७ तास पाणीसंकट! 'या' भागांतला पाणीपुरवठा राहणार बंद

SCROLL FOR NEXT