Suspected China Ship On Mumbai Port Saam Tv
देश विदेश

China Ship: चीनहून पाकिस्तानला जाणारं जहाज मुंबई बंदरात अडवलं! न्यूक्लियर मिसाइल साहित्याचा मोठा साठा

Suspected China Ship On Mumbai Port : भारतीय सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी जहाजाला अडवल्यानंतर त्यावर लादलेल्या वस्तूंची तपासणी केली. या जहाजात संगणक संख्यात्मक नियंत्रण(CNC)मशीन होते. या सीएनसी मशीनचा उपयोग पाकिस्तान क्षेपणास्त्र करण्यासाठी करेल असा शंका व्यक्त करण्यात येत आहे.

Bharat Jadhav

Indian Security Agencies Stopped Suspected Ship on Mumbai Port:

चीनमधून मुंबईमधील न्हावा शेवा (Nhava Sheva) बंदरावर आलेल्या एका जहाजाला भारतीय सुरक्षा दलाने (Indian security forces) अडवलंय. जहाजात असलेलं साहित्याचा उपयोग पाकिस्तान क्षेपणास्त्र बनवण्यासाठी करेल असा संशय व्यक्त केला जात आहे. गृप्तहेरांनी सीमा शुल्क अधिकाऱ्यांना या जहाजाविषयीची माहिती दिली होती. CMA-CGMहे जहाज चीनहून पाकिस्तानात जात होते.(Latest News)

भारतीय सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी जहाजाला अडवल्यानंतर त्यावर लादलेल्या वस्तूंची तपासणी केली. या जहाजात संगणक संख्यात्मक नियंत्रण(CNC) मशीन होते. डीआरडीओच्या टीमद्वारेही जहाजावरील वस्तूंची तपासणी करण्यात आलीय. या सीएनसी मशीनचा उपयोग पाकिस्तान क्षेपणास्त्र करण्यासाठी करेल असा शंका व्यक्त करण्यात येत आहे. चीनमधून कराचीला जाणाऱ्या या जहाजाची माहिती गृप्तहेरांनी भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानंतर भारतीय सुरक्षा रक्षक सतर्क झाले आणि त्यांनी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात या जहाजाला अडवलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान भारतीय सुरक्षा दलाने याविषयी माहिती ट्विट करत दिलीय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल ऑफ लॅडिंग आणि इतर कागदपत्रांनुसार, जहाजावरील वस्तू शांघाय जेएक्सई ग्लोबल लॉजिस्टिक कंपनी लिमिटेडमधून लादण्यात आल्या होत्या. या वस्तू सियालकोट येथील पाकिस्तान विंग्स प्रायव्हेट लिमिटेड येथे पोहोचवल्या जाणार आहेत.

दरम्यान या जहाजावर मिळालेल्या सीएनसी मशीन इटालियन कंपनीकडून तयार केल्या जातात. हे मशीन कॉम्प्यूटरद्वारे नियंत्रित केली जाते. या मशीनद्वारे कार्यक्षमता, सातत्य आणि अचूकतेची पातळी प्राप्त करता येते. मीडिया रिपोर्ट्सनुसार या सीएनसी मशीन्स १९९६ च्या वासेनार यांच्या करारात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

हा करार एक आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र नियंत्रण प्रणाली आहे. भारत हा या करारातील ४२ सदस्य देशांपैकी एक आहे. हे देश त्यांच्या पारंपरिक शस्त्रे, आण्विक कार्यक्रम इत्यादींशी संबंधित माहिती आणि माहितीची देवाणघेवाण करतात. उत्तर कोरियाने सीएनसी मशीनचा वापर अणू शस्त्रास्त्रे करण्यासाठी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

SCROLL FOR NEXT