bedrolls in trains saam tv
देश विदेश

Indian Railways: प्रवाशांनाे! Bedrolls ची सुविधा आता १५० रुपयांत; जाणून घ्या कीट

प्रवाशांना प्रवासा दरम्यान बेडरोलची सुविधा मिळत नव्हती.

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) गेल्या दाेन वर्षांपासून बंद ठेवलेली बेडराेल्सची सुविधा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या ही सुविधा मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस, मुंबई-दिल्ली ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस, गोल्डन टेंपल मेल आणि पश्चिम एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये उपलब्ध आहे. हळूहळू सर्व गाड्यांमध्ये सुविधा पूरवली जाईल असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. (Indian Railways resumes service of bedrolls in trains)

रेल्वेच्या प्रवासा दरम्यान स्वतः जवळ कमीत कमी सामान असावे अशी धारणा प्रवाशांची (passengers) असते. त्याचाच विचार करुन रेल्वेने डिस्पोजेबल बेडरोलची (bedrolls) सुविधा सुरू केली हाेती. त्यामुळे प्रवाशांना जड ब्लँकेट, चादर स्वतः जवळ बाळगण्याची गरज भासत नव्हती. ही सुविधा काेराेनाचा (corona) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बंद ठेवण्यात आली हाेती.

बेडराेल्स सेवेअंतर्गत प्रवाशांना १५० रुपयांमध्ये डिस्पोजेबल बेडरोल दिले जातात. त्याचा फायदा लांब पल्याच्या प्रवासात प्रवाशांना हाेताे. या किटमध्ये ब्लँकेटसोबत टूथपेस्ट, मास्क यांसारख्या वस्तूही दिल्या जाताहेत.

(indian railways) असे आहे बेडराेल्स किट

बेडशीट पांढरा

ब्लँकेट ग्रे/ब्लू

इन्फ्लेटेबल एअर पिलो व्हाईट

उशीचे कव्हर पांढरे

फेस टॉवेल/नॅपकिन पांढरा

थ्री-प्लाय फेस मास्क

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीचा मोर्चा- वर्षा गायकवाड

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT