सुटीतील पर्यटनासाठी जाणून घ्या १७ hoilday special trains

indian railways
indian railways
Published On

सातारा : काेविड १९ चे रुग्ण संख्या घटू लागल्याने तसेच आगामी काळातील सणासुदीच्या कृष्टीने भारतीय रेल प्राधिकरणाने सुट्टीच्या विशेष गाड्यांची सेवा वाढविण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने सुमारे १७ सुट्टीच्या विशेष रेल्वेची 17 holiday special trains सेवा पुढील वर्षापर्यंतच्या जून-जूलै महिन्यापर्यंत वाढविली आहे. याबाबतची माहिती उत्तर पश्चिम रेल्वेचे North Western Railway मुख्य जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट शशी किरण यांनी माध्यमांना दिली.

भारतीय रेल्वेने indian railway सेवा वाढविलेल्या १७ सुट्टीच्या विशेष रेल्वेमध्ये ट्रेन क्रमांक 02990/02989, अजमेर-दादर-अजमेर त्रिमिक साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन २९ जून २०२२ (प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवार) आणि ३० जून २०२२ (प्रत्येक गुरुवार, शनिवार आणि सोमवार) पर्यंत.

ट्रेन क्रमांक 09708/09707 श्री गंगानगर-वांद्रे टर्मिनस-श्रीगंगानगर विशेष ट्रेन सेवा श्रीगंगानगर ३० जून २०२२ पर्यंत आणि वांद्रे टर्मिनसवरून दाेन जुलै २०२२ पर्यंत वाढवण्यात येत आहे.

ट्रेन क्रमांक 02473/02474, बिकानेर-वांद्रे टर्मिनस-बिकानेर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष सेवा २७ जून २०२२ (प्रत्येक सोमवार) आणि वांद्रे टर्मिनस २८ ऑगस्ट २०२२ (प्रत्येक मंगळवार) पर्यंत वाढवण्यात आली आहे.

indian railways
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लिमये भारतीय संघाची कॅप्टन

ट्रेन क्रमांक 02489/02490, बिकानेर-दादर-बिकानेर द्वि-साप्ताहिक विशेष सेवा बीकानेर येथून २८ जून २०२२ पर्यंत आणि दादर येथून २९ जून २०२२ पर्यंत सेवा वाढवण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 02940/02939, जयपूर-पुणे-जयपूर सुपरफास्ट द्वि-साप्ताहिक विशेष सेवा जयपूरहून २८ जून २०२२ (प्रत्येक मंगळवार आणि शनिवार) आणि पुण्याहून २९ जून २०२२ (प्रत्येक बुधवार आणि रविवार) पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 04817/04818, भगत की कोठी-दादर-भगत की कोठी या द्वि-साप्ताहिक विशेष रेल्वे ३० जून २०२२ (प्रत्येक सोमवार आणि गुरुवार) आणि दादरहून एक जुलै २०२२ (प्रत्येक मंगळवारआणि शुक्रवार) पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 09601/09602, उदयपूर शहर - न्यू जलपाईगुडी - उदयपूर शहर उदयपूर शहराकडून साप्ताहिक विशेष रेल्वे सेवा २५ जून २०२२ (प्रत्येक शनिवारी) आणि नवीन जलपाईगुडी पासून २७ जून २०२२ (प्रत्येक सोमवार) पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 04854 /044853, जोधपूर-वाराणसी-जोधपूर त्रिकोणीय साप्ताहिक विशेष ट्रेन जोधपूर ते 30 जून 2022 (प्रत्येक सोमवार, गुरुवार आणि शनिवार) आणि वाराणसी ते 29 जून 2022 (प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शनिवार) पर्यंत धावेल.

04864/04863 क्रमांकाची ट्रेन, जोधपूर-वाराणसी-जोधपूर साप्ताहिक विशेष ट्रेन जोधपूर येथून २८ जून २०२२ (प्रत्येक मंगळवार, शुक्रवार आणि रविवार) आणि वाराणसीपासून एक जुलै २०२२ (प्रत्येक मंगळवार, शुक्रवार आणि रविवार) पर्यंत धावेल.

ट्रेन क्रमांक 04866/04865, जोधपूर-वाराणसी-जोधपूर साप्ताहिक विशेष ट्रेन जोधपूरहून २६ जून २०२२ (प्रत्येक बुधवारी) आणि वाराणसीहून ३० जून २०२२ (प्रत्येक गुरुवारी) पर्यंत सेवा वाढविण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 02495/02496, बिकानेर-कोलकाता-बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे सेवा ३० जून २०२२ (प्रत्येक गुरुवारी) आणि कोलकाता येथून एक जुलै २०२२ (प्रत्येक शुक्रवार) पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 02458/02457 बिकानेर-दिल्ली सराय रोहिल्ला-बिकानेर सुपरफास्ट विशेष ट्रेन ३० जून २०२२ पर्यंत बिकानेर आणि दिल्ली सराय रोहिल्ला येथून ३० जून २०२२ पर्यंत सेवा वाढविण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 04712/04711, श्रीगंगानगर-हरिद्वार-श्रीगंगानगर प्रतिनिधी स्पेशल ट्रेन ३० जून २०२२ पर्यंत तसेच ट्रेन क्रमांक 04731/04732, दिल्ली सराय रोहिल्ला-भटिंडा-दिल्ली सराय रोहिल्ला प्रदाई विशेष क्रमांकाची ट्रेन ३० जून २०२२ पर्यंत, ट्रेन क्रमांक 02471/02472, श्रीगंगानगर-दिल्ली-श्रीगंगानगर प्रतीक सुपरफास्ट स्पेशल ३० जून २०२२ पर्यंत वाढवण्यात येत आहे.

ट्रेन क्रमांक 04888/04887, बारमेर-ऋषिकेश-बारमेर विशेष ट्रेन सेवा बारमेरपासून ३० जून २०२२ पर्यंत आणि ऋषिकेशहून एक जुलै २०२२ पर्यंत, ट्रेन क्रमांक 02988/02987, अजमेर-सियालदाह-अजमेर सुपरफास्ट दैनिक विशेष रेल्वे सेवा अजमेरहून ३० जून २०२२ पर्यंत आणि सियालदाहून एक जुलै २०२२ पर्यंत सेवा वाढविण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com