Railways beats fog with new device Saam Tv
देश विदेश

Indian Railways: आता धुक्यातही रेल्वेसेवा राहणार सुरळीत, भारतीय रेल्वे 'या' नवीन तंत्राचा करणार वापर

Indian Railways News: हिवाळ्यामधील धुक्याच्या वातावरणामुळे दर वर्षी विशेषतः देशाच्या उत्तरेकडेच्या भागातील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. यावर आता रेल्वेने तोडगा काढला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Railways Beats Fog with New Device:

हिवाळ्यामधील धुक्याच्या वातावरणामुळे दर वर्षी विशेषतः देशाच्या उत्तरेकडेच्या भागातील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. यावर आता रेल्वेने तोडगा काढला आहे. धुक्याच्या हवामानात रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी, भारतीय रेल्वेने 19,742 फॉग पास डिव्हाइस, अर्थात धुके भेदून जाणाऱ्या उपकरणांची तरतूद केली आहे.

हा उपक्रम रेल्वे सेवेची विश्वासार्हता वाढवण्याच्या, विलंब कमी करण्याच्या आणि प्रवाशांची एकूण सुरक्षितता वाढवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फॉग पास डिव्हाइस हे एक जीपीएस आधारित दिशादर्शक उपकरण आहे. जे लोको पायलटला (चालक) दाट धुक्याच्या परिस्थितीत मार्ग शोधायला मदत करते. हे उपकरण हे लोको पायलट्सना, सिग्नल, लेव्हल क्रॉसिंग गेट (मानव आणि मानवरहित), कायमस्वरूपी वेग प्रतिबंधक, तटस्थ विभाग, ई. यासारख्या स्थिर खुणांच्या स्थळांची प्रत्यक्ष अद्ययावात माहिती (दृश्य आणि ध्वनीच्या स्वरूपातील मार्गदर्शन) प्रदान करते. हे उपकरण, व्हॉईस मेसेजसह भौगोलिक क्रमाने, अंदाजे 500 मीटर अंतरावर समोर येणाऱ्या पुढील तीन निश्चित लँडमार्क्सची (स्थिर खुणांची) आगाऊ सूचना देते. (Latest Marathi News)

फॉग पास डिव्हाइसची सामान्य वैशिष्ट्ये:

• सिंगल लाईन, डबल लाईन, इलेक्ट्रीफाईड तसेच नॉन इलेक्ट्रीफाईड विभाग, यासारख्या सर्व प्रकारच्या विभागांसाठी योग्य.

• सर्व प्रकारच्या वीज आणि डिझेल वरील इमू/मेमू.डेमू गाड्यांसाठी योग्य.

• 160 KMPH पर्यंत गाडीच्या वेगासाठी योग्य.

• 18 तास चालणार्‍या अंतर्भूत री-चार्जेबल बॅटरीची सुविधा.

• पोर्टेबल (हलवता येण्याजोगे), आकाराने कॉम्पॅक्ट (लहान), वजनाने हलके (बॅटरीसह 1.5 की. पेक्षा जास्त नाही) आणि मजबूत डिझाइन.

• लोको पायलटना आपली ड्युटी सुरू होताना रेल्वे गाडीत हे उपकरण सहज नेता येते.

• लोकोमोटिव्ह च्या कॅब डेस्कवर सहजपणे ठेवता येते.

• ही एक स्वतंत्र प्रणाली आहे.

• धुके, पाऊस किंवा सूर्यप्रकाश यांसारख्या हवामानाच्या परिस्थितीमुळे ते प्रभावित होत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे ४००० मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT