Indian Railways News
Indian Railways News Saam Tv
देश विदेश

Indian Railways: रेल्वेने लोअर बर्थचा नियम बदलला, आता 'या' प्रवाशांसाठी ही सीट असणार आरक्षित

Satish Kengar

Indian Railways Latest News Today : भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. अशा परिस्थितीत आपल्या हवी असलेली सीट मिळविण्यासाठी अनेक प्रवासी हे एक महिना अगोदर तिकीट बुक करतात. बहुतेक लोकांसाठी पसंतीची सीट ही लोअर बर्थ किंवा साइड लोअर बर्थ असतो. मात्र आता सगळ्यांनाच या सीट बुक करता येणार नाही.

भारतीय रेल्वेने याबाबत आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, रेल्वेचा खालचा बर्थ काही श्रेणीतील लोकांसाठी राखीव असेल. चला तर जाणून घेऊ आता लोअर बर्थ सीट कोणासाठी असेल आरक्षित..

रेल्वेने शारीरिकदृष्ट्या अंपग व्यक्तींना ट्रेनचे खालचे बर्थ आरक्षित केले आहेत. त्यांचा प्रवास अधिक सुकर करण्यासाठी भारतीय रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

Indian Railways Seat Reservation : या जागा असणार राखीव

रेल्वे बोर्डाच्या (Railway Board) आदेशानुसार, स्लीपर क्लासमधील दिव्यांगांसाठी 4 जागा (2 खालील 2 मध्यम), थर्ड एसीमध्ये 2 जागा, AC3 इकॉनॉमीमध्ये 2 जागा राखीव आहेत. यासोबतच प्रवास करणारे लोक या सीटवर बसू शकतील.

तसेच गरीब रथ ट्रेनमध्ये 2 लोअर बर्थ आणि 2 वरच्या बर्थच्या जागा दिव्यांगजनांसाठी राखीव आहेत. त्यांना या जागांसाठी पूर्ण भाडे द्यावे लागणार आहे. याशिवाय एसी चेअर कार ट्रेनमधील दोन जागा दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असतील.

Indian Railways Seat Reservation : ज्येष्ठ नागरिकांना न मागता मिळणार सीट

भारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना न मागता लोअर बर्थ देण्यात येते. ट्रेनमध्ये स्लीपर क्लासमध्ये 6 ते 7 लोअर बर्थ, प्रत्येक थर्ड एसी कोचमध्ये 4-5 लोअर बर्थ, प्रत्येक सेकंड एसी कोचमध्ये 3-4 लोअर बर्थ, 45 वर्षे आणि त्यावरील गर्भवती महिलांसाठी ट्रेनमध्ये आरक्षित आहेत. कोणताही पर्याय न निवडता त्यांना जागा मिळते.

तसेच तिकीट बुक करताना ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग किंवा गर्भवती महिलेला वरची सीट दिली गेली, तर ऑनबोर्ड तिकीट तपासणीदरम्यान टीटीने त्यांना खालची सीट देण्याची तरतूद आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार; राज ठाकरे

Mumbai-Pune Express Highway: १८ आणि १९ तारखेला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दीड तास राहणार बंद, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

INDIA Alliance: मोठा भाई, छोटा भाई, ४ तारखेनंतर कोणीही राहत नाही; भाजपवर संजय राऊतांची मिश्किल टीका

Ajit Pawar Speech Dadar: २० तारखेला विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ, अजित पवारांचा निर्धार

RCB vs CSK: हाय व्होल्टेज सामन्यावर पावसाचं सावट; RCB च्या अपेक्षांवर पाणी फेरणार?

SCROLL FOR NEXT