भारतीय रेल्वेने प्रवाशांची सोय आणि त्यांच्या वाढत्या गरजा लक्षात घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवाशांना आता विना आरक्षणाशिवाय फक्त तिकीट काढून प्रवास करता येणार असून, या सेवेमुळे प्रवाशांना काहीसा दिला मिळणार आहे. लांबचा पल्ला गाठणारे ट्रेन आता विना आरक्षणाशिवाय प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहेत. या गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना फक्त तिकीट काढावी लागणार आहे. तसेच यूटीएस अॅपद्वारेही आपण तिकीट बुक करू शकतो.
कोणत्या गाड्या धावतील विना आरक्षण?
विना आरक्षणाच्या रेल्वे डब्यांमध्ये सामान्य वर्ग आणि आसन श्रेणीचे डबे असतील. आयआरसीटीसीच्या १० नवीन गाड्या देशातील प्रमुख शहरांना जोडतील. या गाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असून, रिझर्वेशन करण्याची देखील चिंता मिटणार आहे. काही मिनीटात ऐनवेळी फक्त तिकीट काढून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. ही रेल्वे सेवा २० जानेवारीपासून प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे.
दिल्ली - जयपूर एक्सप्रेस,दिल्लीहून सकाळी ६ वाजता निघेल, जयपूर येथे दुपारी १:३० वाजता पोहचेल.
मुंबई - पुणे सुपरफास्ट, मुंबईहून सकाळी ७:३० वाजता निघेल आणि ११:०० वाजेच्या दरम्यान पुण्यात पोहचेल.
कोलकाता - पाटणा इंटरसिटी, कोलकाता येथून सकाळी ५ वाजता निघेल आणि पाटणा येथे दुपारी २ वाजता पोहचेल.
चेन्नई - बंगळूरू एक्सप्रेस, चेन्नईहून सकाळी ८ वाजता निघेल आणि दुपारी ३:३० वाजता बंगळूरू येथे पोहचेल.
अहमदाबाद - सुरत फास्ट, अहमदाबाद येथून सकाळी ७ वाजता प्रस्थान होईल आण दुपारी १२:३० वाजता सुरतला पोहचेल.
लखनऊ - वाराणसी एक्सप्रेस, लखनऊ येथून सकाळी ७ वाजता प्रस्थान होईल आणि दुपारी दीडच्या दरम्यान वाराणासीत येथे आगमन होईल.
भोपाळ - इंदूर इंटरसिटी, भोपाळहून सकाळी ६:३० वाजता प्रस्थान होईल, तर दुपारी १२:०० वाजता इंदूर येथे आगमन होईल.
हैदराबाद - विजयवाडा एक्सप्रेस, हैदराबादहून सकाळी ७:३० वाजता सुटेल आणि विजयावाडा येथे दुपारी २:०० वाजता आगमन होईल.
जयपूर - अजमेर फास्ट, जयपूर येथून सकाळी ८ वाजता प्रस्थान, अजमेर येथे रात्री ११:३० वाजता आगमन होईल.
पाटणा - गया एक्सप्रेस, पाटण्याहून सकाळी ६ वाजता प्रस्थान होईल आणि गया येथे सकाळी ९:३० वाजता आगमन होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.