वंदे भारतची आणखी एक नवी ट्रेन लवकरच रूळावर धावणार Saam Tv
देश विदेश

Vande Bharat Train : भारतीय रेल्वेची मोठी कामगिरी; वंदे भारतची आणखी एक ट्रेन रुळावर येणार, कुठून धावणार?

Indian Railway Launch New Vande Bharat Express : भारतीय रेल्वेने २०२४-२५ आर्थिक वर्षात वंदे भारत कोचच्या उत्पादनात गती वाढवली आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांमुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी सेवा मिळत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय रेल्वेच्या उत्पादन युनिट इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई यांनी वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ICF ने देशातील ८२ वा वंदे भारत चेअर कार रेक तयार केला आहे. ही नवीन ट्रेन लवकरच रुळांवर धावताना दिसणार आहे. मात्र, नवी वंदे भारत ट्रेन कोणत्या भागातून धावणार, याबद्दल रेल्वेने अधिकृत माहिती दिलेली नाही. भारतीय रेल्वेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात वंदे भारत कोचच्या उत्पादनात मोठी गती आणली आहे. या स्वदेशी बनावटीच्या आधुनिक रेल्वेसेट्समुळे भारतीय रेल्वे प्रवासात क्रांतिकारी बदल झाले आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्यामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. यामुळे प्रवाशांना अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी सेवा मिळत आहेत.

वंदे भारत ट्रेनचे डब्बे चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये तयार केले जात आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात ICF ने आपल्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ केली आहे. यामुळे अधिक गाड्या जलद गतीने तयार करता येत आहेत. या उपक्रमामुळे भारतीय रेल्वेच्या आधुनिकरणास वेग आला आहे. यामुळे देशातील रेल्वे वाहतुकीत मोठी सुधारणा झाली आहे.

भारतीय रेल्वेच्या उत्पादन युनिट इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई यांनी वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ICF ने देशातील ८२ वा वंदे भारत चेअर कार रेक तयार केला आहे. ही नवीन ट्रेन लवकरच रुळांवर धावताना दिसणार आहे. मात्र, नवी वंदे भारत ट्रेन कोणत्या भागातून धावणार, याबद्दल रेल्वेने अधिकृत माहिती दिलेली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, २० फेब्रुवारी २०२५ रोजी ICF ने ८२ वा वंदे भारत चेअर कार रेक यशस्वीपणे तयार केला. ३१ मार्चपर्यंत आणखी तीन वंदे भारत रेक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने वेगाने काम सुरू आहे.

या जलदगती उत्पादनामुळे भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणास मोठी चालना मिळत आहे. वंदे भारत ट्रेनमुळे प्रवाशांना वेगवान, आरामदायी आणि आधुनिक प्रवास अनुभवायला मिळत आहे.

वंदे भारत ट्रेनमध्ये किती प्रकारचे कोच असतात?

इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई येथे ३ प्रकारच्या कोचसह वंदे भारत ट्रेनसेट तयार केले जात आहेत. यामध्ये ८, १६ आणि २० कोच रेकचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत, ICF ने केवळ ८-कोच आणि १६-कोच रेक तयार केले होते. मात्र आता २०-कोच रेकचाही समावेश करण्यात आला आहे.

देशभरात सध्या १३६ वंदे भारत गाड्या धावत आहेत. त्यातील काही गाड्या विविध रेल्वे विभागांच्या अखत्यारित आहेत:

मध्य रेल्वे (CR) आणि दक्षिण मध्य रेल्वे (SCR) – ८ वंदे भारत ट्रेन

ईस्ट कोस्ट रेल्वे (ECOR), ईस्ट सेंट्रल रेल्वे (ECR) आणि ईस्टर्न रेल्वे (ER) – ६ वंदे भारत ट्रेन

उत्तर मध्य रेल्वे (NCR) – २ वंदे भारत ट्रेन सेवा

ईशान्य रेल्वे (NER), ईशान्य सीमावर्ती रेल्वे (NFR), दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR), आणि पश्चिम मध्य रेल्वे (WCR) – प्रत्येकी ४ वंदे भारत ट्रेन सेवा

उत्तर रेल्वे (NR) – सर्वाधिक २२ वंदे भारत ट्रेन सेवा चालवत आहे.

या आधुनिक आणि वेगवान गाड्यांनी भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. वंदे भारत ट्रेनमुळे देशभरातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी झाला आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT