indian railway saam tv
देश विदेश

Travel Insurance: रेल्वे तिकीट बुक करण्यापूर्वी काढा 'प्रवास विमा', फक्त 49 पैशांमध्ये मिळतील लाखोंचे फायदे

Odisha Train Accident: रेल्वेकडून ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या वेळी प्रवास विम्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Priya More

Indian Railways: ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी भीषण रेल्वे अपघात (Odisha Train Accident) झाला. या रेल्वे अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अपघातातील मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. आतापर्यंत 288 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 900 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या भीषण रेल्वे अपघातानंतर सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर गंभीर जखमींना प्रत्येकी 2 लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या रेल्वे अपघातामुळे अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. अशा अपघातानंतर सरकारकडून कुटुंबीयांना मदत दिली जाते. पण जर तुम्ही रेल्वे तिकीट काढताना प्रवास विमा घेतला असता तर तुम्हाला हा पैसा देखील मिळतो. महत्वाचे म्हणजे रेल्वेकडून ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या वेळी प्रवास विम्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. फक्त 49 पैशांमध्ये हा प्रवास विमा (Travel Insurance) मिळत असून त्याचे लाखोंचे फायदे आहेत.

रेल्वेचे तिकीट बुक करताना तुम्हाला फक्त 49 पैसे खर्च करून 10 लाख रुपयांपर्यंतचा प्रवास विमा मिळतो. हा विमा रेल्वे प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर आहे. आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइट किंवा कोणत्याही अॅपवरून तुम्ही तिकीट बुक करताना तुम्हाला यासाठी परवानगी मागितली जाते. याअंतर्गत जर तुम्ही विम्याचा पर्याय निवडला तर ट्रेन अपघातात मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळते. दुसरीकडे अंशतः अपंगत्व आल्यास 7.5 लाख रुपयांची भरपाई दिली जाते. दुसरीकडे, रुग्णालयात दाखल झाल्यास 2 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध आहेत.

या आरआरसीटीच्या अधिकृत वेबसाईटवरुन काढलेल्या या प्रवास विम्याचा तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. कारण ओडिशा सारखी दुर्घटना झाली तर तुम्हाला 10 लाखांपर्यंतची नुकसान भरपाई मिळू शकते. यामुळे तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबीयांना देखील फायदा होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, जर तुम्ही हा प्रवास विमा घेतला तर जखमी व्यक्तीचे नॉमिनी किंवा त्याचा उत्तराधिकारी याच्या मदतीने विम्यासाठी दावा करू शकतो. पण रेल्वे अपघातानंतर ४ महिन्यांच्या आत तुम्हाला यासाठी दावा करावा लागेल. तुम्ही विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन विम्यासाठी दावा दाखल करू शकता. पण तुमच्या प्रवास विम्यामध्ये तुमचा नॉमिनी नसेल तर तुम्हाला कोणतीही रक्कम मिळणार नाही.

जे प्रवासी रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुक करतात त्यांच्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. तुम्ही जेव्हा IRCTC वेबसाइटवर तिकीट बुक करताना 'ट्रॅव्हल इन्शुरन्स'चा पर्याय दिसतो. हा विमा रेल्वे अपघातात झालेल्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आहे. तिकीट बुक करताना त्यावर क्लिक करून तुम्हाला काही तपशील भरावे लागतील. त्यानंतर तुम्ही या विम्याअंतर्गत नोंदणी करु शकता. जर तुम्ही हा विमा घेत नसाल तर इथून पुढे रेल्वे प्रवास करताना नक्की घ्या. कारण हा तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT