Railway Ticket Rule Change Social Media
देश विदेश

Indian Railway: रिझर्व्हेशन कोचमधून प्रवास करताय तर थांबा, रेल्वेच्या वेटिंग तिकीटाबाबत समोर आली मोठी अपडेट

Railway Ticket Rule Change: वेटिंग तिकिटांमुळे रिझर्व्हेशन बोगीमध्ये मोठी गर्दी होत आहे. या गोष्टी लक्षात घेता रेल्वेने वेटिंग तिकीटाच्या नियामांमध्ये बदल केले आहेत. यापुढे वेटिंग तिकीटासह रिझर्व्हेशन कोचमधून प्रवास करता येणार नाही.

Priya More

प्रवाश्यांचा प्रवास सोपा आणि आरामदायी करण्यासाठी रेल्वेकडून नेहमीच नियमांमध्ये बदल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) असे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये वेटिंग तिकिटांमुळे रिझर्व्हेशन बोगीमध्ये मोठी गर्दी होत आहे. या गोष्टी लक्षात घेता रेल्वेने वेटिंग तिकीटाच्या नियामांमध्ये बदल केले आहेत. नवीन नियमानुसार रिझर्व्हेशन कोचमध्ये (Reservation Coach) फक्त कन्फर्म रिझर्व्हेशन झालेले प्रवासीच प्रवास करू शकणार आहेत.

भारतीय रेल्वेने यासाठी वेटिंग तिकिटांचे नियम बदलले आहेत. रेल्वेच्या वेटिंग तिकिटांसह तुम्ही यापुढे आरक्षण बोगी किंवा एसी कोचमध्ये प्रवास करू शकणार नाही. मग तुम्ही तिकीट ऑनलाइन बुकिंगद्वारे किंवा तिकीट काउंटरवरून घेतले असेल तरी देखील तुम्हाला या कोचमधून प्रवास करता येणार. तुम्ही तिकीट काउंटरवरून वेटिंग तिकीट घेतले असले तरी देखील तुम्हाला रिझर्व्हेशन कोचमध्ये बसता येणार नाही.

रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुम्ही आयआरसीटीसीद्वारे ऑनलाइन वेटिंग तिकीट बुक केले तर तुम्ही रिझर्व्हेशन कोचमधून प्रवास करू शकणार नाही. तिकीट कन्फर्म न झाल्यास तुमचे पैसे आपोआप तुम्हाला परत मिळतील. पूर्वी लोक वेटिंग तिकीट घेऊन रिझर्व्हेशन कोचमधून प्रवास करायचे. पण आता असे होणार नाही. रेल्वे तिकीट काउंटरवरून खरेदी केलेले वेटिंग तिकीट घेऊन तुम्ही फक्त जनरल कोचमध्ये प्रवास करू शकणार आहात. रिझर्व्हेशन किंवा एसी कोचमधून प्रवास करण्यासाठी कोणतीही सूट मिळणार नाही.

तुम्ही वेटिंग तिकिटासह रिझर्व्हेशन कोचमधून प्रवास केल्यास TTE तुम्हाला पुढील स्टेशनवर उतरवू शकतो. यासोबतच तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. वेटिंग तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रिझर्व्हेशन कोचमध्ये प्रवेश मिळणार नाही. असे करताना पकडले गेल्यास ४४० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. तुम्ही वेटिंग तिकीट घेऊन रिझर्व्हेशन कोचमध्ये गेल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल. तुमच्याकडून सुरुवातीच्या स्टेशनपासून प्रवासापर्यंत भाडे आकारले जाऊ शकते आणि किमान ४४० रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT