Indian Railway x
देश विदेश

Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात १२,००० स्पेशल ट्रेन चालवणार

Indian Railway News : दिवाळी, छठ पूजा या सणांच्या निमित्ताने अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेने १२,००० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Yash Shirke

  • दिवाळी आणि छठपूजेदरम्यान प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे १२,००० विशेष गाड्या चालवणार आहे.

  • या गाड्या नियमित गाड्यांमध्ये तिकीट न मिळालेल्या प्रवाशांसाठी अतिरिक्त बर्थची सोय करतील.

  • रेल्वे प्रशासनाचा उद्देश सणासुदीला प्रवाशांची गैरसोय टाळणे आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचवणे आहे.

भारतीय रेल्वेने दिवाळी आणि छठ पूजा या सणांच्या निमित्ताने १२,००० विशेष ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना सणासुदीला त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत होईल. खास म्हणजे नियमित गाड्यांमध्ये तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना अतिरिक्त बर्थची सोय करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

कामाच्या निमित्ताने अनेकजण महानगरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करतात. काहीजण शैक्षणिक कारणांमुळे दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होतात. सणासुदीला असे अनेक लोक आपापल्या घरी जाण्यासाठी भारतीय रेल्वेचा वापर करतात. या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि छट पूजेच्या वेळी १२ हजार विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली. येत्या दिवाळी आणि छठ सणांमध्ये प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था केली जाईल, असे रेल्वेमंत्री म्हणाले. प्रवाशांना परतीच्या प्रवासातही सुविधा मिळावी हेही लक्षात ठेवले पाहिजे. लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर, येत्या दिवाळी आणि छठसाठी १२ हजार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

२०२४-२०२५ या काळात होळी, उन्हाळी सुट्ट्या यादरम्यान प्रवाशांसाठी १३,५०० विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या. याशिवाय १ ऑक्टोबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत दिवाळीच्या निमित्ताने ७,९९० विशेष गाड्या चालवल्या गेल्या होत्या. तब्बल १.८ कोटी प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला होता. महाकुंभमेळ्यादरम्यानही भारतीय रेल्वेने १३ जानेवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत १७,३०० हून अधिक गाड्या चालवल्या होत्या. तेव्हा अंदाजे ४.२४ कोटी प्रवाशांना रेल्वेची सेवा मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगाव जिल्ह्यातील भडगावमधील हॉटेलमध्ये भीषण स्फोट; १० जण जखमी, परिसर हादरला|VIDEO

Maharashtra Live News Update: शरद पवारांनी टोचले पक्षाच्या नेत्यांचे कान

Corn Bhaji Recipe : कुरकुरीत, खमंग कॉर्न भजी; फक्त १० मिनिटांत तयार होईल टेस्टी रेसिपी

Thyroid Insomnia Issue : वेळेवर झोप लागत नाहीये? असू शकतो हा गंभीर आजार, वेळीच व्हा सावध

Car Accident : रिंग रोडवर अपघाताचा थरार, अस्थी विसर्जन करून परतताना कुटुंबावर काळाचा घाला, २ मुलांसहित ७ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT