Indian Navy New Flag Twitter/@IndiannavyMedia
देश विदेश

Indian Navy New Flag: भारतीय नौदलाकडून शिवरायांचा गौरव; राजमुद्रेतून प्रेरणा घेत नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

कोच्ची, केरळ: आजचा दिवस देशासाठी ऐतिहासिक आहे. देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विक्रांत' (INS Vikrant) भारतीय नौदलात सामील झाली आहे, यामुळे भारताची सागरी ताकद वाढली आहे. याचसोबत भारतीय नौदलाकडून (Indian Navy) छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरव करण्यात आला आहे. भारतीय नौदलाने नव्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. या नव्या झेंड्याची प्रेरणा छत्रपतींच्या काळातली राजमुद्रा यावरुन घेण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाचे जनक (Father Of Indian Navy) म्हटलं जातं, याचाच सन्मान म्हणून नौदलाच्या नव्या झेंड्यावर राजमुद्रेच्या आकाराची आकृती काढण्यात आली आहे. (Indian Navy New Flag News In Marathi)

हे देखील पाहा -

आजचा दिवस हा भारतीय नौदलासोबतच मराठी माणसासाठी खास दिवस आहे. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नवीन नौदल चिन्हाचे अनावरण केले. नौदलाचा नवा ध्वज जवानांना नवी उर्जा देईल. आजपासून नौदलाचा नवा ध्वज फडकत राहिल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत असल्याचे म्हटले आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून म्हणाले की, आज देशाच्या नव्या भविष्याचा उदय झाला आहे, या सुवर्णक्षणाचे आपण साक्षीदार आहोत. विकसित राष्ट्रांच्या दिशेनं भारताचं पाऊल पडलं आहे. अमृत महोत्सवातील अतुलनीय अमृत म्हणजे विक्रांत, आत्मनिर्भर भारताचं प्रतिबिंब म्हणजे विक्रांत, भविष्यातील आव्हानांना उत्तर म्हणजे विक्रांत, विक्रांत ही देशाच्या परिश्रम, प्रतिभेचं कौतुक, ही नव्या सूर्याची नवी प्रभा, नमो भारत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, भारतानं गुलामीची निशाणी आज उतरवली. आता भारतीय नौदलाचा नवा ध्वज फडकेल. नौदलाचा नवा ध्वज शिवाजी महाराजांना समर्पित करतो आहोत. छत्रपती शिवरायांनी आरमाराचं महत्त्व जाणलं. छत्रपती शिवरायांनी नौदलाचा विकास केला असं म्हणत पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे. तसेच नवा ध्वज नौदलाला नवी ऊर्जा देईल. सैन्याच्या तिन्ही दलांत महिलांचा सहभाग असेल, युद्धभूमीवर महिलांना सामील केलं जातंय असं म्हणत आत्मनिर्भर देश नेहमीच सशक्त राहील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, आज रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

Weather Alert : मुंबई, कोकणासह विदर्भातील १८ जिल्ह्यांत आज तुफान पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Numerology : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात धोरणी अन् हुशार; तुमचा भाग्यांक कोणता? जाणून घ्या...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, या राशीच्या व्यक्तींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण; फक्त कर्म चांगले ठेवा

Horoscope Today : कोणाच्या राशीत आज काय? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT