Indian migrants Hindustan live
देश विदेश

Indian Immigrants: स्थलांतरित भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढण्यास सुरुवात; पहिलं विमान अमृतसरमध्ये पोहोचलं

Illegal Immigrants : भारताशिवाय ब्राझील, मेक्सिकोसह इतर अनेक देशांतील अवैध स्थलांतरितांना अमेरिकेने देशाबाहेर काढण्यास सुरूवात केलीय.

Bharat Jadhav

अमेरिकेतून निर्वासित भारतीयांना घेऊन येणारे विशेष लष्करी विमान C-17 (फ्लाइट क्रमांक RCM 175) आज दुपारी श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ अमृतसर येथे उतरलं. अमेरिकन विमान अमृतसर विमानतळावर दुपारी १.५५ वाजता उतरलं. यामध्ये पंजाब, हरियाणा, गुजरात, चंदीगड, हिमाचल प्रदेश, गोवा आणि यूपीमधील लोकांचा समावेश आहे. विमानात १३ मुले, ७९ पुरुष आणि २५ महिलांसह एकूण १०४ भारतीय आहेत.

यातील ३३ जण गुजरातमधील आहेत, तर तर महाराष्ट्रातील तीन जण आहेत. त्यांना विमानतळावरूनच गुजरातला पाठवण्यात येणार आहे. अमेरिकेच्या या विमानात क्रू मेंबर्स आणि अमेरिकन अधिकारीही होते, जे भारतीयांना अमृतसर विमानतळावर सोडतील आणि परत अमेरिकेला जातील. अमेरिकन लष्कराचं विमान C-17 ने अमृतसर येथे येण्यासाठी मंगळवारी अमेरिकेतील सॅन अँटोनियो येथून उड्डाण भरले होते.

अमृतसरला पोहोचलेल्या विमानातील बहुतेक लोक पंजाबचे आहेत. हे डंकी मार्गाने म्हणजेच अवैध मार्गाने अमेरिकेत पोहोचले होते, परंतु त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्रे नाहीयेत. यापूर्वी असे वृत्त होते की, अमेरिकन विमान २०५ भारतीयांना घेऊन येत होते. पण त्यात फक्त १०४ लोक असल्याची माहिती समोर आलीय.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील लोकांमध्ये ३० जण पंजाबचे आहेत, तर गुजरात आणि हरियाणा येथील ३३-३३ लोक आहेत. त्यात यूपी आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी तीन जण आहेत. चंदीगड येथील दोन जण रहिवासी आहेत. अजून किती लोक आले याची अधिकृत आकडेवारी जाहीर झालेली नाहीये. दरम्यान अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांची ही पहिली तुकडी आहे. भविष्यात अमेरिकेतून आणखी काही विमानांमध्येही भारतीयांना पाठवले जाऊ शकते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर लगेचच तेथे राहणाऱ्या अवैध स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशात पाठवले जातंय. दरम्यान अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अवैध प्रवाशांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्यात येत आहे. या महिमेबद्दल सविस्तर माहिती देण्यास अमेरिकी प्रशासनाने नकार दिलाय. तर भारतातील अमेरिकी वकिलातीच्या अधिकारी यासंबंधी अधिकची माहिती देऊ शकले नाहीत. मात्र अमेरिकेच्या सीमा सुरक्षेसाठी अवैध नागरिकांना देशाबाहेर काढण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींमध्ये चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी या अवैध प्रवाशांबाबत चर्चा केलीय. अशा १८ हजार अवैध प्रवाशी भारतीयांना परत घेण्यास तयारी भारताने दर्शवलीय. मात्र या लोकांना त्यांचं राष्ट्रीयत्व सिद्ध करणारी कागदपत्रे आवश्यक असल्याची भूमिका भारताने घेतलीय. अमेरिकेत नोकरी, उद्योगाच्या निमित्ताने गेलेले सुमारे १.४ कोटी लोक अवैधरित्या तेथे राहत आहेत. त्यात सुमारे १८ हजार भारतीयांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत ५३८ अवैध प्रवाशांना अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT