Wheat Saam TV
देश विदेश

...म्हणून भारत सरकारने गव्हाची निर्यात थांबवली!

गव्हाच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन केंद्र सरकारने गहू निर्यातीवर (Wheat Export) तात्काळ बंदी घातली आहे.

वृत्तसंस्था

India Stops Wheat Export: गव्हाच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन केंद्र सरकारने गहू निर्यातीवर (Wheat Export) तात्काळ बंदी घातली आहे. ताज्या सरकारी आदेशात गहू निषिद्ध श्रेणीत (Prohibited Category) ठेवण्यात आला आहे. भारत सरकारने (Government Of India) काल शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशाबाहेर जाणाऱ्या गव्हाच्या निर्यातीवर (Export) बंदी घालण्यात आली आहे.

डीजीएफटीने (DGFT) म्हटले आहे की, 'गव्हाच्या निर्यात धोरणावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे...' विभागीय आदेशात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की भारत सरकार आपल्या नागरिकांना अन्न सुरक्षा (Food Security) प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. तर, शेजारील आणि मित्र देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या सरकारच्या विनंतीच्या आधारावर, आता केवळ विशिष्ट परिस्थितीतच गव्हाच्या निर्यातीला परवानगी दिली जाणार आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे (Russia Ukraine War) गव्हाच्या जागतिक पुरवठ्यात अडथळा आल्याने निर्यातबंदी लागू करण्यात आली आहे. कारण, रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गव्हाचे प्रमुख निर्यातदार आहेत.

आजची जागतिक परिस्थिती लक्षात घेता, भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण केलं जाऊ शकेल, यासाठीही हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच भारतीयांच्या ताटातून भाकरी गायब होऊ नये म्हणून सरकारने विशेष व्यवस्था केली आहे.

आकडे काय सांगतात?

या आठवड्यात जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, किरकोळ महागाईने एप्रिलमध्ये इंधन आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे आठ वर्षांच्या उच्चांक गाठला आहे. मोठ्या जागतिक मागणीमुळे, भारताची गहू निर्यात 2021-22 मध्ये 7 दशलक्ष टन किंवा US$ 2.05 अब्ज इतकी वाढली. डीजीएफटीच्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात एकूण गव्हाच्या निर्यातीपैकी जवळपास 50 टक्के माल बांगलादेशला पाठवण्यात आला होता. देशातून यावर्षी सुमारे 9,63,000 टन गव्हाची निर्यात झाली, जी मागील वर्षी याच कालावधीत 1,30,000 टन होती.

भारत सरकारने चालू आर्थिक वर्षात (2022-23) 10 दशलक्ष टन गहू निर्यात करणे अपेक्षित होते. वाणिज्य मंत्रालयाने (Ministry of Commerce) नुकतेच सांगितले होते की, भारत गव्हाच्या निर्यातीला चालना देण्याच्या शक्यता शोधण्यासाठी मोरोक्को, ट्युनिशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड, व्हिएतनाम, तुर्की, अल्जेरिया आणि लेबनॉन या नऊ देशांना व्यावसायिक शिष्टमंडळ पाठवणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT