मुंबई: मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतीच तिने तिच्या फेसबुक अकाउंटवर एक कविता शेयर केली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका पोस्ट शेअर केली आहे. अॅडव्होकेट नितीन भावे (Adv, Nitin Bhave) नावाच्या एका व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने आपल्या फेसबुकवर शेअर केली आहे. याला आता राष्ट्रवादीनेही प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी केतकीला तिच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. (NCP Leader Suraj Chavan Criticize to Actress Ketaki Chitale about offensive post about sharad pawar)
केतकीने केलेली फेसबूक पोस्ट -
अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या एका व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने आपल्या फेसबुकवर शेअर केली आहे. शरद पवारांनी जवाहर राठोड यांच्या कवितेच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याबद्दलची ही पोस्ट असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर तिच्यावर कळवा पोलीस स्थानकात (Kalwa police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनीही केतकीला तिच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. सूरज चव्हाण यांनी ट्विट करत दोन ओळींमध्येच केतकीवर बोचरी टीका केली आहे. चव्हाण यांनी ट्विट केलं की, नको करू एवढे पाप I शेवटी पवार साहेबचं तुझा बापII चितळेंची चाले फक्त भाकरवाडी I केतकी तर चार आण्याची पुडी I अशा ओळी पोस्ट करत त्यांनी केतकीला धारेवर धरलं आहे.
राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलेलं ट्विट -
दरम्यान, याआधी देखील केतकी एका पोस्टमुळे अडचणीत सापडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही तिने वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर ती वादात सापडली होती. त्यावेळीही शिवप्रेमींनी तिला ट्रोल केले होते. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती. तर आता शरद पवारांविरोधात केलेल्या या फेसबुक पोस्टनंतर तिच्यावर कळवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.