Union Minister Statement On POK 
देश विदेश

Pahalgam Attack: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध पुकारा; केंद्रीय मंत्र्यांचं विधान

Union Minister Statement On POK: भारत सरकारने पाकव्याप्त ताब्यात घ्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलीय. मंत्री आठवले लोणवळ्यात विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केलीय.

Bharat Jadhav

पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरुद्धात कडक कारवाई सुरू केलीय. भारताने प्रशासकीय स्ट्राइक करत पाकिस्तानची चहुबाजुने कोंडी केलीय. पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर पाकव्याप्त काश्मीर भारताने परत घ्यावा, अशा मागणीने जोर धरलाय. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही पाकव्याप्त काश्मीर घेण्याबाबत मोठं विधान केलंय.

जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आहे तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहणार आहेत. याकरिता माझी भारत सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा. जर देत नसतील तर पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारा, असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. ते लोणावळ्यात एका पत्रकारांशी बोलत होते.

लोणावळा शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी रामदास आठवले लोणावळ्यात आले होते. यावेळी लोणावळा शहरातील पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या प्रकल्पांना निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पहलगाव येथे झालेला दहशतवादी हल्ला निंदनीय आहे. त्याच मार्गाने दहशतवादी भारतात येतात. त्यामुळे तो भाग भारतात घेणे आवश्यक आहे.

पाकिस्तानी व्यापलेला तो भाग सोडा, युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. आमचं सरकार याविषयी गंभीर आहे, विरोधकांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोणावळा येथे व्यक्त केले.

पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी

पहलगाम हल्ल्यानंतर देशातील मुस्लिम संघटनांनी संताप व्यक्त करत पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी केलीय. जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळलीय. दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू नागरिकांसह मुस्लिमांनी निदर्शने केली. यावेळी मुस्लिम संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पाकिस्तानने अतिशय भ्याड कृत्य केलंय. हा पाक नाही तर हा नापाक देश आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी याचा बदला घ्यावा.

दरम्यान दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाकडून कारवाई केली जात आहे. आतापर्यंत काश्मीरमध्ये ९ दहशतवाद्यांची घरे बॉम्बने आणि बुलडोझर फिरवून जमिनदोस्त करण्यात आली आहेत. शनिवारी रात्री लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जमील अहमदचे घर सुरक्षा दलांनी बॉम्बने उडवून दिले. एक दिवस आधी काश्मीरमध्ये दोन सक्रिय लष्कर-ए-तोएबाच्या दहशतवाद्यांची घरे उडवून देण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT