Mandsaur Accident: भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली कार विहिरीत कोसळली, १० जणांचा मृत्यू

MP Mandsaur Accident : मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये एक भीषण अपघात झालाय. या अपघातात १० जाणांचा मृत्यू झालाय. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि इतर एजन्सी बचाव कार्य करत आहेत.
Mandsaur Accident
MP Mandsaur Accident
Published On

मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात कचरिया गावात एक व्हॅनाचा भीषण अपघात झालाय. एक व्हॅन कार विहिरीत कोसळल्याने १० जणांचा मृत्यू झाला. हा अपघात नारायणगड पोलीस स्टेशन हद्दीतील कचरिया गावात घडलाय. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि इतर एजन्सी बचाव कार्य करत आहेत. घटनास्थळी उपमुख्यमंत्री जगदीश देवदा पोहोचले असून त्यांनी सर्व घटनेची माहिती घेतलीय. चालकाचे व्हॅनवरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन रस्त्यावरून घसरून विहिरीत कोसळली असल्याची माहिती त्यांनी दिलीय.

कारमध्ये दोन मुलांसह १३ जण बसले होते. त्यापैकी चार जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अजून बचाव कार्य सुरू आहे. उपमुख्यमंत्री जगदीश देवडा हे घटनास्थळी पोहोचलेत. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडून घटनेची महिती घेतलीय. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव इको व्हॅन अनियंत्रित झाली होती. इको व्हॅनने प्रथम दुचाकीस्वाराला धडक दिली, त्यानंतर कार रस्त्याजवळील विहिरीत कोसळली.

या व्हॅनमध्ये एकूण १३ जण होते. चार जखमींना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. तर प्रशासनाने १० जणांच्या मृत्यूची पुष्टी केलीय. अपघातग्रस्त इको व्हॅन गॅसवर चालत होती, त्यामुळे विहिरीत पडल्यानंतर त्यातून गॅस गळती सुरू झाली, असे सांगितले जात आहे. या काळात बचावकार्य करण्यातही अडचणी आल्या. उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांना अपघाताची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण बचाव कार्यादरम्यान ते तेथे होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com