केंद्र सरकारचं ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल संसदेत मंजूर झालं.
या विधेयकाद्वारे ऑनलाइन बेटिंग व जुगाराला बंदी घालण्यात आली आहे.
सोशल गेम्स आणि ई-स्पोर्ट्सला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आलाय.
ऑनलाइन गेमिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कायदा लागू होणार आहे.
केंद्र सरकारने सादर केलेलं 'ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल' दोन्ही लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे. या विधेयकाचा उद्देश ऑनलाइन सोशल गेम्स आणि ई-स्पोर्ट्सना प्रोत्साहन देत, ऑनलाइन गेमिंग नियंत्रित करणे आहे. केंद्र सरकारने हे विधेयक पास करत थेट आजाराचा मुळावर घाव घातलाय. या ऑनलाइन बेटिंग करणारे आणि ऑनलाइन जुगारामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झालेत. आता सरकारच्या या स्ट्राईकमुळे ऑनलाइन जुगारावर आळा घालण्यात आलाय.
दरम्यान सादर केलेल्या या विधेयकात ऑनलाइन पैशाचे गेम खेळणाऱ्यांना कोणतीही शिक्षा होणार नसल्याचं म्हटलंय. पण जे सर्व्हिस देणारे आहेत. जाहिरातदार, प्रमोटर आणि अशा खेळांना आर्थिक मदत करतात त्यांना मात्र शिक्षा होणार आहे.
ऑनलाइन मनी गेमिंग सेवा देणाऱ्यांना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा १ कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. ऑनलाइन पैशांच्या खेळांची जाहिरात करणाऱ्यांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ५० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जर कोणी वारंवार नियमांचे उल्लंघन केले तर त्याची शिक्षा पाच वर्षांपर्यंत वाढू शकते आणि दंड देखील जास्त असेल.
दरम्यान लोकसभेतील गोंधळात ऑनलाइन गेमिंग बिल चर्चा न करता पास झालं. त्यानंतर राज्यसभेत विरोधकांच्या सभात्यागानंतर आसाममधील गुवाहाटी येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या स्थापनेशी संबंधित विधेयकावर थोडक्यात चर्चा झाली. या थोड्या चर्चेनंतर, हे विधेयक राज्यसभेतही मंजूर केले. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल सादर केले.
गेल्या ११ वर्षांत डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रसार खूप वेगाने झालाय. नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आणि त्यामुळे देशाची एक नवीन ओळख देखील निर्माण झालीय. स्टार्टअप इकोसिस्टममध्ये प्रगती झालीय. तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत, परंतु असेच एक क्षेत्र म्हणजे ऑनलाइन गेमिंग, जे एक अतिशय महत्त्वाचे क्षेत्र बनलंय .
नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे आणि त्यामुळे देशाची एक नवीन ओळख देखील निर्माण झाली आहे. स्टार्टअप इकोसिस्टममध्ये प्रगती झाली आहे. अश्विनी वैष्णव म्हणाल्या की, तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत, परंतु असेच एक क्षेत्र म्हणजे ऑनलाइन गेमिंग, जे एक अतिशय महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे. गेमिंग क्षेत्रात तीन विभाग आहेत.
पहिला विभाग ई-स्पोर्ट्स विभाग आहे, ज्यामध्ये धोरणात्मक विचारसरणी वाढते आणि व्यक्ती संघात समन्वय साधण्यास शिकते. दुसरा विभाग ऑनलाइन सोशल गेम्सचा आहे. आपण सर्वांनी बुद्धिबळ, सॉलिटेअर, सुडोकू पाहिले आहेत. तर यातील तिसरा विभाग हा ऑनलाइन पैशाचे खेळाचा जुगाराचा आहे. जो आज समाजात एक प्रमुख चिंतेचे विषय बनलाय, असं मंत्री अश्विनी वैष्णव बिल पास करताना म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.