Scotland Gurudwara Incident Saam Tv
देश विदेश

Scotland Gurdwara Incident: स्कॉटलंडच्या गुरुद्वारात उच्चायुक्तांना प्रवेश नाकारला, भारताने आक्षेप नोंदवताच ब्रिटनचा कारवाईचा इशारा

Scotland News: स्कॉटलंडच्या गुरुद्वारात उच्चायुक्तांना प्रवेश नाकारला, भारताने आक्षेप नोंदवताच ब्रिटनचा कारवाईचा इशारा

Satish Kengar

Scotland Gurudwara Incident:

स्कॉटलंडमध्ये भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याची घटना घडली आहे. यावर आता भारताने तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुद्दा ब्रिटिश परराष्ट्र कार्यालय आणि पोलिसांसमोरही मांडण्यात आला आहे.

ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांना खलिस्तानी कट्टरवाद्यांनी ग्लासगो गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले होते. यानंतर वादात पडण्याऐवजी भारतीय उच्चायुक्तांनी तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. ज्यांनी विक्रम दोराईस्वामीला रोखले ते कॅनडात मारले गेलेले खलिस्तानी दहशतवादी निज्जरचे समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताने आक्षेप नोंदवल्यानंतर ब्रिटनने कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

दोराईस्वामी यांना गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखल्याची घटना शुक्रवारी घडली, जेव्हा ते तेथे बैठकीसाठी जात होते. अल्बर्ट ड्राइव्हवरील ग्लासगो गुरुद्वाराच्या समितीसोबत ही बैठक होणार होती. खलिस्तान समर्थकांना या बैठकीची माहिती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.  (Latest Marathi News)

यानंतर तेथे पोहोचलेल्या काही लोकांनी त्यांना गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास रोखलं. यादरम्यान किरकोळ बाचाबाची झाली. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओही इन्स्टाग्रामवर आला आहे. व्हिडिओमध्ये एक खलिस्थानी कार्यकर्ता गुरुद्वारा समितीच्या सदस्याशी भांडताना दिसत आहे.

यानंतर समितीच्या व्यक्तीने खलिस्थानी कार्यकर्त्याचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते जमलं नाही. यानंतर दोन खलिस्थानी कार्यकर्ते कार पार्कमध्ये उच्चायुक्तांच्या कारकडे जातात आणि कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, परंतु कार आतून बंद असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. नंतर तिथून गाडी निघते. गुरुद्वारा समितीच्या सदस्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी डोंबिवलीत पार पडला नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग

Rajma vs Chole: राजमा की छोले, सर्वाधिक प्रोटिन कशात? उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल

शेतजमीन खरेदीचा प्लॅन आहे का? ५ महत्त्वाचे डॉक्युमेंट्सच तपासाच; अन्यथा आयुष्यभराची कमाई बुडणार

high fiber superfoods : पोट निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत हे 7 फायबरयुक्त सुपरफूड्स

Upvasachi Batata Bhaji Recipe : नवरात्रीच्या उपवासाला बनवा दाण्याच्या कुटाची बटाट्याची भाजी, चव इतकी भन्नाट की पुन्हा पुन्हा खाल

SCROLL FOR NEXT