Iran Saam Tv
देश विदेश

Iran: शक्य तितक्या लवकर इराण सोडा, युद्धविरामानंतर केंद्र सरकारकडून भारतीयांना सूचना जारी; नेमकं काय म्हणाले?

Central Government Advisory for Indian Stuck in Iran: केंद्र सरकारकडून इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दोन आठवड्यांसाठी युद्ध थांबवल्यामुळे लवकरात लवकर इराण सोडा, असं सांगण्यात आले आहे.

Siddhi Hande

इराण-इस्त्रायल युद्ध दोन आठवड्यांसाठी थांबलं

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना देश सोडण्याच्या सूचना

केंद्र सरकारने जारी केली अॅडवायजरी

अमेरिका इराणने युद्ध थांबवण्याची घोषणा केली. युद्ध थांबवण्याची घोषणा करताच केंद्र सरकारने इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. भारतीयांसाठी प्रवासासंबंधित अॅडवायजरी जारी केली आहे. त्यामध्ये भारतीयांना शक्य तितक्या लवकर इराण सोडण्याचे आवाहन केले आहे. भारताने हाय अलर्ट जारी केला आहे.

केंद्र सरकारने भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर इराण सोडण्याचे निर्देश दिले आहे. भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यासही सांगितले आहे. तसेच परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडू नका, फक्त शिफारस केलेल्या मार्गांचाही सल्ला देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने जारी केले हेल्पलाइन नंबर

केंद्र सरकारने इराणमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. नागरिक +989128109115, +989128109109, +989128109102, आणि +989932179359 या नंबरवर कॉल करु शकतात. याचसोबत cons.tehran@mea.gov.in या ईमेलद्वारे संपर्क साधू शकतात. इराणमधील भारतीयांना ४८ तास सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दोन आठवड्यांसाठी युद्धाला पूर्णविराम

अमेरिका आणि इराणमधील युद्धाला दोन आठवड्यांसाठी पूर्णविराम मिळाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काल ७ एप्रिल रोजी याबाबत घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला तडजोड करण्यासाठी ६ संधी दिल्या आहेत, असंही अमेरिकेचं म्हणणं आहे. त्यामुळे आता दोन आठवडे शस्त्राचा वापर करणार नाही. या कालावधीत इराणमधील भारतीयांना परत येण्याच्या सूचना केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT