Indian Army Saam Digital
देश विदेश

Indian Army: प्रसुती रजेबाबत संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, जाणून घ्या कोणाला होईल फायदा

Indian Army: भारतीय सैन्यदल, वायूदल आणि हवाई दलातील जवानांना बालसंगोपन आणि मूल दत्तक घेण्यासाठी अधिकाऱ्यांइतकीच रजा मिळणार आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Indian Army

भारतीय सैन्यात प्रसुती रजेसाठी यापुढे वरिष्ठ कनिष्ठ असा भेदभाव केला जाणार नसून सर्व महिला जवानांना समान रजा मिळणार आहे. सैन्यदल, वायूदल आणि हवाई दलातील जवानांना बालसंगोपन आणि मूल दत्तक घेण्यासाठी अधिकाऱ्यांइतकीच रजा मिळणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलातील महिला जवानांना मातृत्व, बालसंगोपन आणि मूल दत्तक रजेसाठी त्यांच्या अधिकाऱ्यांइतकीच रजा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे महिला जवानांच्या सैन्यातील कामाच्या स्थितीत सुधारणा होणार आहे. तसेच महिलांना व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात संतुलन राखण्यास मदत होणार आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये तैनात राहण्यापासून ते अथांग समुद्र आणि आकाशावर अधिराज्य गाजवण्यात महिला जवानही यशस्वी झाल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रातील अडथळे महिलांनी पार केले आहेत, अशी प्रशंसा संरक्षण मंत्रालयाने केली आहे. २०१९ मध्ये भारतीय सैन्यात महिलांची भरती करून एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला होता. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची गरज असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना नेहमीच वाटत आले आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT