देश विदेश

MiG-21 Fighter Aircraft Crashed: राजस्थानमध्ये हवाई दलाचे विमान घरावर कोसळले, 4 नागरिकांचा मृत्यू; भीषण अपघाताचा VIDEO समोर

Latest News: अपघातानंतर विमानाला आग लागली आणि ते जळून खाक झाले.

Priya More

Rajasthan News: राजस्थानमध्ये (Rajasthan) हवाई दलाचे (Air Force) विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान (Mig-21 Fighter Aircraft) घरावर कोसळले. राजस्थानच्या हनुमानगडजवळ ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये दोन पायलट सुखरुप आहेत. पण रहिवासी ठिकाणी विमान कोसळल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या हनुमानगड येथील भारत-पाकिस्तान सीमेजवळ हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले. या विमानाने सुरतगड येथून उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच विमान कोसळले. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि विमान कोसळले.

विमानामध्ये दोन पायलट होते. या दोन्ही पायलटने विमान कोसळण्यापूर्वीच उडी मारली त्यामुळे दोघांचे प्राण वाचले. पण हे विमान घरावर कोसळल्यामुळे यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातानंतर विमानाने पेट घेतला. विमानाचे तुकडे गावाच्या अनेक ठिकाणी पडले असून विमान जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Sawant: असं सौंदर्य पाहिलं अन् मनात काहूर माजलं

Nashik : नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! पोलिसांनी उतरवला केंद्रीय मंत्र्यांच्या निकटवर्तीयांचा माज, काय आहे प्रकरण?

World Cup 2027: रोहित-कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार का? काय म्हणाला कर्णधार गिल?

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून घायवळ कुटुंबियांवर कारवाईचा बडगा

Hair Care: केमिकल ट्रिटमेंटपेक्षा घरात तयार केलेलं 'हे' तेल केसांना लावा, डँडरफपासून ते हेअर फॉलपर्यंत सगळ्या समस्या होतील दूर

SCROLL FOR NEXT