Hydrogen Train Saam Tv
देश विदेश

Hydrogen Train: मुंबई किंवा दिल्ली नाही तर या ठिकाणाहून धावणार सर्वात पहिली हायड्रोजन ट्रेन

India's First Hydrogen Train: देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच धावणार आहे. हायड्रोजन ट्रेन बनवणारा भारत हा जगातील पाचवा देश असणार आहे.

Siddhi Hande

देशातील पहिली हायड्रेजन ट्रेन ही तयार झाली आहे. हायड्रोजन ट्रेनमुळे प्रदुषण कमी होणार आहे. ही ट्रेन हायड्रोजनवर चालणार आहे. भारतात तयार झालेली ही हायड्रेजन ट्रेन लवकरच सुरु केली जाणार आहे.या ट्रेनमुळे नागरिकांचा प्रवास आणखी सुखी होणार आहे. (Hydrogen Train)

हायड्रोजन ट्रेनचे ट्रायल झाले आहे. ही ट्रेन लवकरच सामान्य नागरिकांसाठी सुरु होणार आहे. हायड्रेजन ट्रेनचे काही फोटो याआधी आरडीएसओने शेअर केले होते. ही ट्रेन आतून खूप प्रशस्त आहे. या ट्रेनमध्ये सर्व सुविधा मिळणार आहे. या ट्रेनने वेगवान प्रवास होणार आहे.या ट्रेनला आरडीएसओने डिझाइन केले आहे. ज्यात इंटिग्रल कोच फॅक्ट्री चैन्नईमध्ये बनवली आहे.

देशातील ही पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच धावणार आहे. ही ट्रेन मुंबई- पुण्यात नव्हे तर हरियाणात धावणार आहे. हरियाणातील जींद ते सोनीपत यादरम्यान ही ट्रेन धावणार आहे. देशातील हायड्रोजन ट्रेन मार्च-एप्रिल २०२५ पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. (Hydrogen Train From Haryana)

हायड्रोजन ट्रेन (Hydrogen Train Features)

वंदे भारतनंतर हायड्रोन ट्रेन हा प्रकल्प भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारत हा हायड्रोजन ट्रेन चालवणारा भारत ५ वा देश ठरणार आहे. या हायड्रोजन ट्रेनमध्ये हॉर्स पॉवर इंजिन असणार आहे. जगातील फ्त चार देशांमध्येच या इंजिनची निर्मिती केली जाते. त्यातील एक भारत आहे. इतर देश ५०० ते ६०० पॉवर असलेलेल इंजिन तयार करतात. भारतीय रेल्वेने आता स्वतः १२०० हॉर्स पॉवर क्षमतेचे इंजिन बनवले आहे. हरियाणातील जिंद ते सोनीपत या मार्गावर हायड्रोजन ट्रेनचे प्रशिक्षण केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT