Indian Government Warn Indigo Airlines 
देश विदेश

India vs Turkey: तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा; भारत सरकारचे इंडिगोला निर्देश, शिवसेनेच्या लढ्याला यश

Indian Government Warn Indigo Airlines: तुर्कीने पाकिस्तानला मदत केल्याचे समोर आले. तेव्हापासून भारताने तुर्कीविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केलीय.

Bharat Jadhav

संजय गडदे, साम प्रतिनिधी

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' केलं. त्यावेळी तुर्कीने पाकिस्तानला मदत केली. पाकिस्तानला पाठिंबा दिला. तेव्हापासून भारताने तुर्कीविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केलीय. भारतात बॉयकॉट तुर्की अभियानदेखील छेडत तुर्कीचा पर्यटन व्यवसायांचे कंबरडे मोडले. आता सरकारने देशातील सर्वात मोठी खासगी विमान कंपनी इंडिगोला तुर्कीसोबतचे करार रद्द करण्यास सांगितले आहेत.

तुर्की एअरलाइन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार रद्द करण्याचे निर्देश भारत सरकारकडून देण्यात आलेत. भारत आणि तुर्कीमधील वाढत्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. तर सरकारने याबाबतचा निर्णय घ्यावा यासाठी शिंदे गटाची शिवसेना आग्रही होते. तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या उघड समर्थनाच्या पार्श्वभूमीवर, भारतात तुर्कीशी संबंधित कंपन्यांचा सहभाग अत्यंत धोकादायक ठरत आहे.

हे सातत्याने अधोरेखित करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या या प्रयत्नांना मोठं यश मिळालंय. केंद्र सरकारने इंडिगोला तुर्कस्तानच्या Turkish Airlines सोबतचा करार पुढील तीन महिन्यांत समाप्त करण्याचे आदेश दिलेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे नेतृत्व करणारे मंत्री राम मोहन नायडू यांनी स्पष्टपणे सांगितलं की, हा करार यापुढे कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही. या निर्णयामुळे तुर्कस्तानला आर्थिक व धोरणात्मक मोठा फटका बसला आहे. ही शिवसेनेच्या ठाम भूमिका आणि लढ्याचं स्पष्ट फलित आहे.

शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, आमदार मूरजी पटेल आणि विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांच्या पुढाकाराने विविध पातळ्यांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून, Celebi NAS आणि Turkish Airlines यासारख्या तुर्की कंपन्यांचा भारतातील वर्चस्वाला विरोध नोंदवला होता. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान तुर्कीने पाकिस्तानला उघड मदत केली. यानंतर भारताने तुर्कीविरोध कठोर भूमिका घेतली.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोला तुर्की एअरलाइन्सकडून घेतलेल्या दोन बोईंग 777-300ER विमानांसाठी 'वेट लीज करार' फक्त तीन महिन्यांसाठी वाढवण्याची परवानगी दिली, पण यावेळी अटी घातल्यात. या कालावधीनंतर इंडिगो हा करार रद्द करेल आणि भविष्यात त्यासाठी आणखी मुदतवाढ मागणार नाही, ही अट घातली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमान उड्डाणात अचानक व्यत्यय येऊ नये म्हणून ३ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कालावधी वाढवला. ही भाडेपट्टा ३१ मे रोजी संपत होता. 'डंप लीज' अंतर्गत, तुर्की एअरलाइन्स विमान, पायलट आणि देखभाल सुविधा पुरवतेय. तर इतर क्रू मेंबर्स इंडिगोचे आहेत. DGCA ने दोन्ही विमानांच्या भाडेपट्ट्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत तीन महिन्यांनी वाढवलीय. विमान कंपनीने सहा महिन्यांची मुदतवाढ मागितली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT