Pakistan Terror Funding saam Tv
देश विदेश

Terror Funding: पाकचं टेरर फंडिंग; पाकिस्तानविरोधात भारताचा अॅक्शन प्लॅन

Pakistan Terror Funding: पाकिस्तानच्या टेरर फंडिंगचे पुरावेच भारताच्या हाती लागलेत. त्यामुळे दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचं नाक दाबण्याची योजनाच भारतानं आखलीय.भारताचा प्लॅन नेमका काय आहे? आणि पाक कसा मेटाकुटीला येणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.मात्र त्यानंतरही कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच याप्रमाणे पाक काही सुधारला नाही. त्यांनी थेट दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त झालेले अड्डे पुन्हा उभे कऱण्यासाठी मदत जाहीर केली. त्याचे पुरावेच भारताच्या हाती लागलेत. तर हे पुरावेच फायनान्शियन अॅक्शन टास्क फोर्सला देऊन भारतानं पाकचं कंबरडं मोडण्याची रणनीती आखलीय.

पाकचं टेरर फंडिंग, भारताच्या हाती पुरावे

बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना पाकची आर्थिक मदत

दहशतवाद्यांना हवाला नेटवर्क आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून मदत

आयएमएफच्या मदतीतून पाक दहशतवाद्यांना पोसत असल्याचे पुरावे

पाककडून संरक्षण क्षेत्रावर बजेटच्या 18 टक्के खर्च

दहशतवाद्यांना आर्थिक मदतीमुळे एफएटीएफ च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची मागणी

फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स हे वेगवेगळ्या देशांच्या आर्थिक गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवते..मात्र पाकिस्तान वर्ल्ड बँक आणि आयएमएफ कडून मिळालेल्या कर्जाचा वापर दहशतवाद्यांना पोसण्यासाठी करत असल्यानं भारतानं पुराव्यांची जुळवाजुळव केलीय. त्यामुळे एफएटीएफनं ग्रे लिस्टमध्ये टाकल्यास पाकिस्तानवर कठोर आर्थिक निर्बंध लादले जातील. एवढंच नाही तर पाकिस्तानमधील परकीय गुंतवणूकही कमी होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे आधीच बेकारी, बेरोजगारीने हैराण झालेल्या पाकिस्तानला एफएटीएफनं दणका दिल्यास पाकचं कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plastic surgery : कॅन्सरमुळे तरुणानं लिंग गमावलं, ८ वर्षांनी प्लास्टिक सर्जरीद्वारे लिंगाची पुनर्रचना, साडे ९ तास चाललं ऑपरेशन

What not to ask ChatGPT: चुकूनही ChatGPT ला विचारू नका या गोष्टी; फायदा सोडून नुकसान होईल

GK: भारतात सूर्य सर्वात आधी मावळतो कोणत्या गावात मावळतो?

Maharashtra Live News Update: सुर्यवंशी मृत्यू प्रकरण; सोमनाथच्या मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

SCROLL FOR NEXT