Supreme Court  Saam Tv
देश विदेश

मोठी बातमी! देशाचे नवे सरन्यायधीश ठरले, CJI गवईंनी केली शिफारस

Justice Surya Kant set to become the next Chief Justice of India : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची आपल्या उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली आहे. केंद्राकडून मान्यता मिळाल्यास सूर्यकांत हे भारताचे ५३ वे सरन्यायाधीश ठरणार आहेत.

Namdeo Kumbhar

Justice Surya Kant Recommended as Next Chief Justice of India by CJI Bhushan Gavai : भारताचे विद्यमान सरन्यायाधीश (CJI) भूषण गवई यांनी आज न्यायमूर्ती सूर्यकांत यांची आपला उत्तराधिकारी म्हणून केंद्राकडे शिफारस केली. न्यायमूर्ती सूर्यकांत हे सध्या गवई यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत.सरन्यायाधीश भूषण गवई हे २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. केंद्राने अधिसूचना जारी केल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे ५३ वे सरन्यायाधीश होतील. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, सरन्यायाधीश गवई यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली. २४ मे २०१९ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. सूर्यकांत यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली तर त्यांचा कार्यकाळ अंदाजे एक वर्षे दोन महिन्याचा असेल. कारण, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे.

कोण आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत?

न्यायमूर्ती सूर्यकांत हे मूळचे हिरयाणामधील हिसार येथील आहेत. सूर्यकांत यांनी १९८१ मध्ये हिसार येथील सरकारी महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केले. १९८४ मध्ये रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी हिसार जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली. वर्षभर हिसारमध्ये काम केल्यानंतर ते पंजाब आणि हरियाणा न्यायालयात गेले. २००४ मध्ये त्यांना पंजाब आणि हरियाणा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. २०१८ मध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २४ मे २०१९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली हजारो लिटर पाणी वाया

Maharashtra Politics: मविआमध्ये बिघाडी? काँग्रेसचा स्वबळाचा नाऱ्यानं अहिल्यानगरच राजकारण तापलं

भाजपला कुबड्यांची गरज नाही; अमित शहांनी कुणाला दिला इशारा? पाहा व्हिडिओ

Celibrity Divorce: १४ वर्षांचा सुखी संसार मोडला! टीव्ही इंडस्ट्रीतील आणखी एका कपलचा घटस्फोट; चाहत्यांना धक्का

'ती फक्त तळहातावर सुसाईड नोट लिहून...' डॉक्टर तरूणीच्या भावाला वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT