Agni-4 Missile Saam Tv
देश विदेश

Agni-4 Missile: भारताने घेतली अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे देशाच्या लष्करी ताकद वाढली आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. सोमवारी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-4 (Agni-4)ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे देशाच्या लष्करी ताकद वाढली आहे.

संध्याकाळी ७.३० च्या सुमारास ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. अग्नी-४ ची रेंज ४,००० किमी आहे. प्रक्षेपणाने सर्व ऑपरेशनल पॅरामीटर्स तसेच संरक्षण प्रणालीची विश्वासार्हता सत्यापित केली आहे. ही यशस्वी चाचणी भारताच्या (India) विश्वसनीय किमान प्रतिबंध क्षमतेच्या धोरणाची पुष्टी करते.

काही दिवसापूर्वी भारतीय नौदलाने ‘सीकिंग हेलिकॉप्टर’मधून स्वदेशी बनावटीच्या पहिल्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती.

अग्नी 4 भविष्यात भारतीय (India) सैन्याला अधिक ताकद देईल. या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे एकूण वजन १७००० किलोपर्यंत आहे, आणि त्याची एकूण लांबी २० मीटर आहे. अग्नी-4 अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून ते ९०० किमी उंचीपर्यंत उड्डाण करू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT