Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

Surabhi Jayashree Jagdish

औषधं अचानक बंद करू नका

रक्तदाब नियंत्रणात आला म्हणून बीपीची औषधं स्वतःहून बंद करणं योग्य नाही. काही औषधं अचानक थांबवल्याने रक्तदाब पुन्हा वाढण्याचा किंवा इतर त्रास होण्याचा धोका असू शकतो. औषधांमुळे त्रास होत असल्यास किंवा औषधे बंद करण्याची इच्छा असल्यास आधी डॉक्टरांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्या.

Hypertension treatment | saam tv

जीवनशैलीतही बदल करा

केवळ औषधं घेतल्याने रक्तदाब नियंत्रणात राहीलच असं नाही त्यामुळे आहार आणि दैनंदिन सवयींकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, वजन नियंत्रण आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न रक्तदाब नियंत्रणात मदत करू शकतो.

BP medicine side effects | saam tv

साइड इफेक्ट्स समजून घ्या

बीपीच्या औषधांमुळे काही व्यक्तींना चक्कर येणं, पायांना सूज येणं किंवा सतत कोरडा खोकला यांसारखे दुष्परिणाम जाणवू शकतात. प्रत्येक औषधाचे दुष्परिणाम वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या औषधाबद्दल डॉक्टर किंवा फार्मासिस्टकडून योग्य माहिती घ्या.

Home blood pressure monitoring | saam tv

नियमित तपासणी करा

बीपीची औषधं सुरू केल्यानंतर नियमित डॉक्टरांच्या भेटी घेणं महत्त्वाचे असतं. या तपासण्यांमधून रक्तदाब नियंत्रणात आहे की नाही आणि औषधांचा अपेक्षित परिणाम होत आहे की नाही, हे समजण्यास मदत होते.

Blood pressure tablets | saam tv

घरच्या घरी रक्तदाब तपासत राहा

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरच्या घरी रक्तदाब मोजल्यास तुमचे बीपी कसा बदलतो याचा अंदाज घेता येतो. मोजलेलं रीडिंग, तारीख आणि वेळ यांची नोंद ठेवल्यास पुढील तपासणीवेळी डॉक्टरांना उपचार करण्यास मदत होऊ शकते.

Hypertension management | saam tv

स्वतःहून कोणतेही औषध घेऊ नका

बीपीची औषधं सुरू असताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ओव्हर-द-काउंटर औषधं, हर्बल प्रोडक्ट्स किंवा सप्लिमेंट्स घेणं टाळा. काही औषधं किंवा सप्लिमेंट्स रक्तदाबावर परिणाम करू शकतात किंवा तुम्ही घेत असलेल्या बीपीच्या औषधांसोबत रिएक्शन करू शकतात.

BP medication safety | saam tv

औषधं अचानक बंद करू नका

रक्तदाब नियंत्रणात आला म्हणून बीपीची औषधं स्वतःहून बंद करणं योग्य नाही. काही औषधं अचानक थांबवल्याने रक्तदाब पुन्हा वाढण्याचा किंवा इतर त्रास होण्याचा धोका असू शकतो. औषधांमुळे त्रास होत असल्यास किंवा औषधे बंद करण्याची इच्छा असल्यास आधी डॉक्टरांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्या.

Blood pressure lifestyle changes | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Hypertension diet | saam tv

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

Benefits Of Oiling Belly Button
येथे क्लिक करा