World Happiness Report 2025 freepik
देश विदेश

भारत पाकिस्तानपेक्षाही दुःखी, Happiness Report मध्ये जगातील सर्वात आनंदी देश कोणता?

World Happiness Report 2025: भारत आनंदाच्या बाबतीत अनेक देशांपेक्षा मागे आहे आणि येथील लोक पाकिस्तान, इराण, युक्रेनच्या लोकांपेक्षा जास्त दुःखी आहेत. जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे.

Dhanshri Shintre

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेलबीइंग रिसर्च सेंटरने गुरुवारी, गॅलप आणि युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कच्या सहकार्याने वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट २०२५ अहवाल प्रकाशित केला. या अहवालानुसार, भारत १४७ देशांपैकी ११८ व्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ, आनंदाच्या बाबतीत भारत अनेक गरीब आणि अस्थिर देशांपेक्षा मागे आहे. तर पाकिस्तान १०९ व्या क्रमांकावर आहे. नेपाळ हा देश ९२ व्या क्रमांकावर आहे. इराण १०० तर, पॅलेस्टाईन १०३ व्या क्रमांकावर आहे. या देशांपैकी भारताचे रँक सर्वात कमी असल्याचे अहवालात समोर आले आहे.

अहवालानुसार भारताचा स्कोअर या वर्षी ४३८९ पर्यंत सुधारला आहे, पण भ्रष्टाचार आणि लोकांमध्ये उदारतेचा अभाव यामुळे रँकिंगवर परिणाम झाला आहे. फिनलँड, उत्तर युरोपमधील नॉर्डिक देश, सलग आठव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे, त्याचा सरासरी गुण ७.७३६ आहे. अहवालात हे स्पष्ट करण्यात आले आहे की जे देश इतरांच्या दयाळूपणा आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवतात, त्यांमध्ये आनंदाचे प्रमाण जास्त असते.

फिनलँडमध्ये लोकांना पाकीट हरवले तरी परत मिळण्याचा विश्वास असतो, कारण तिथे हरवलेली वस्तू सापडण्याची शक्यता जास्त असते, हे मजबूत सामाजिक विश्वास दर्शवते. भारताचा स्कोअर थोडा सुधारला आहे, जो एक सकारात्मक चिन्ह आहे. मात्र, आनंद सुधारण्यासाठी भारताला सामाजिक आधार, भ्रष्टाचार आणि उदारतेच्या क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता आहे.

संशोधकांचे मत आहे की आरोग्य आणि पैशासोबतच, इतरांसोबत अन्न वाटणे, कोणाची साथ असणे आणि घरात लोक असणे यासारख्या साध्या गोष्टींचाही आनंदावर प्रभाव पडतो. गॅलपचे सीईओ जॉन क्लिफ्टन म्हणतात, आनंद पैसे किंवा वाढीवर नाही, तो विश्वास आणि लोकांशी असलेल्या संबंधांवर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT