Covid 19 Cases In India, Coronavirus In India Updates, Coronavirus News SAAM TV
देश विदेश

सावधान! पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका; देशातील 24 तासांतील आकडेवारी धडकी भरवणारी

आरोग्य मंत्रालयाने गेल्या 24 तासांतील देशातील कोरोना आकडेवारी जाहीर केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना (Corona) रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. देशात दिवसागणिक कोरोनाचे 15 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिम सुद्धा जोमात सुरू आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने गेल्या 24 तासांतील देशातील कोरोना (corona new patients) आकडेवारी जाहीर केली आहे. (Covid 19 Cases In India)

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 16906 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. एक दिवसापूर्वीच्या आकडेवारीशी तुलना करता, गेल्या 24 तासांत सुमारे 3 हजार अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. आता देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 32 हजारांच्या पुढे गेली आहे. तर दैनंदिन सकारात्मकतेचा दर 3.68% वर गेला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 15,447 रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत. दरम्यान, नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 4,36,69,850 वर पोहचली आहे. सध्या देशात कोरोनाचे 1,32,457 सक्रिय प्रकरणे आहेत जी एकूण प्रकरणांच्या 0.30 टक्के आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 5,25,519 लोकांचा मृत्यू झाला आहे. (Coronavirus In India Updates)

देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत एकूण 199.12 कोटी लसीचे डोस लागू करण्यात आले आहेत. देशातील दैनिक सकारात्मकता दर आता 3.68 टक्के आहे आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 4.26 टक्के आहे. गेल्या 24 तासांत देशात कोविडच्या 4,59,302 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण 86.77 कोटी चाचण्या झाल्या आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT