Murali Sriram Naik Saam Tv
देश विदेश

Operation Sindoor : ५ पाकड्यांना संपवलं, शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला; घाटकोपरचे मुरली नाईक शहीद

Murali Sriram Naik : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने सीमेलगतच्या भागात गोळीबार केला. या गोळीबारामध्ये उरी सेक्टरमध्ये कर्तव्यात असणारे जवान मुरली नाईक यांना वीरमरण आले. अतुलनीय धैर्य दाखवत त्यांनी ५ पाकड्यांचा खात्मा केला.

Yash Shirke

Ind Vs Pak : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संंबंध आणखी ताणले गेले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे भारताने नष्ट केले. एकीकडे पाकिस्तान मिसाइल-ड्रोनने भारतावर हल्ले करत आहे, दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी जवान सीमेलगतच्या भागात गोळीबार करत आहेत. उरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणारे जवान मुरली नाईक शहीद झाले आहेत. ५ जणांना कंठस्नान घातल्यानंतर नाईक यांना वीरमरण आले.

काश्मीर सीमेवर पहाटे तीनच्या सुमारास अचानक सुरु झालेल्या गोळीबारात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. तेव्हा जवान मुरली नायक यांनी अतुलनीय धैर्य दाखवत पाच जणांचा खात्मा केला. शत्रूशी झुंज देताना एका गोळीमुळे मुरली नायक यांना वीरमरण आले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लढा दिला होता. मुरली नाईक शहीद झाल्याच्या बातमीने त्यांच्या आंध्र प्रदेशातील मूळ गावी शोककळा पसरली आहे.

जवान मुरली नाईक घाटकोपरच्या कामराजनगर येथे वास्तव्याला होते. आंध्रप्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यात कल्की तांडा मूळ गाव आहे. यात्रेनिमित्त त्यांचे कुटुंब २ मे रोजी गावी गेले होते. त्यामुळे शहीद जवान मुरली नाईक यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी उद्या १० मे रोजी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे ९ तळ भारताने हवाई हल्ले करुन उद्ध्वस्त केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानला ताकीद देखील दिली होती. पण ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने मिसाइल्स-ड्रोन यांच्यामार्फत भारतावर हल्ले केले. त्यांनी सीमावर्ती भागात गोळीबार केला. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात उरीमध्ये कर्तव्यावर असलेले मुरली नाईक शहीद झाले. देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना देशभरातून श्रद्धांजली वाहली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दौंडमध्ये १.४० लाखांचा सिगारेट माल चोरीला, चोरटा सीसीटीव्हीत कैद

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT