India Alliance News Saam Tv
देश विदेश

INDIA Alliance: मोदी सरकारविरोधात 'इंडिया' आघाडीने फुंकले रणशिंग... देशव्यापी सभांचे वेळापत्रक समोर; पहिली सभा कुठे?

INDIA Alliance Rally Schedule: विरोधकांच्या इंडिया आघाडीने मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी

I.N.D.I.A. Committee Meeting: विरोधकांच्या इंडिया आघाडीने मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. इंडिया आघाडीकडून देशव्यापी सभांचे आयोजन करण्यात येणार असून पहिली सभा भोपाळमध्ये होणार आहे. ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवण्यात ही सभा होणार असून एकत्रित सहा सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विरोधकांच्या इंडिया आघाडीची पहिली बैठक नुकतीच दिल्लीमध्ये पार पडली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्य दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक पार पडली. हा बैठकीत इंडिया आघाडीच्या पुढील सभांची घोषणा करण्यात आली.

इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये होईल. भोपाळच्या सभेनंतर दुसरी सभा पाटण्यामध्ये तर तिसरी सभा महाराष्ट्रात नागपूरला होणार आहे. देशभरात एकत्रित सहा सभा घेण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आहे.

दरम्यान, या बैठकीमध्ये इंडिया आघाडीकडून काही वृत्तवाहिन्यांच्या कथित ‘इंडिया’विरोधी निवेदकांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.आघाडीच्या मीडिया कोओरडीनेशन कमिटी आज त्या अँकरची नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीबद्दल द्वेष पसरवणाऱ्या 10 अँकर आणि 5 चॅनलवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Alert : महाराष्ट्रावर वादळी संकट? राज्यात पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-मराठवाडासह अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, वाचा IMDचा इशारा

Dadpe Pohe Recipe : नाश्त्याला बनवा चटपटीत दडपे पोहे, वाचा अस्सल पारंपरिक रेसिपी

गौरव खन्ना की अमाल मलिक कोण उचलणार 'Bigg Boss 19'ची ट्रॉफी? सोशल मीडियावर कुणाच्या नावाची चर्चा

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Pune : ऊसाच्या शेतात लपलेला नरभक्षक बिबट्या शार्पशूटरकडून ठार, शिरूरमध्ये तिघांचा घेतला होता जीव

SCROLL FOR NEXT