नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना (Corona) विषाणूच्या संसर्गाने जोर पकडला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 18 हजार 819 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील दिवसाच्या तुलनेत ३० टक्क्यांहून अधिक प्रकरणे वाढली आहेत. बुधवारी, देशात विषाणू संसर्गाची (Corona Cases) 14,506 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. तर 30 रुग्णांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या आता एक लाखाच्या पुढे गेली आहे. (Corona Cases In India)
देशात 1 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण
देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 4 हजार 555 इतकी झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 13 हजार 827 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.(Corona Latest Updates)
रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ
दरम्यान कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. बुधवारी (29 जून) कोरोनाचे 14 हजार 506 नवीन रुग्ण आढळले होते. यादरम्यान कोरोनाची लागण झालेल्या 30 जणांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाखांच्या पुढे पोहोचली आहे. (Corona Cases In Maharashtra)
महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी धडकी भरवणारी
महाराष्ट्रात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी महाराष्ट्रात 3,957 नवीन कोविड-19 रुग्ण आढळले, ज्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 25,735 झाली. याशिवाय, दिवसभरात 7 मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृतांची संख्या 1,47,922 झाली आहे. काल, बुधवारी दिवसभरात 3696 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्णांची संख्या 77,98,817 झाली आहे.
राज्यातील रिकव्हरी दर 97.82% आहे, सध्या राज्यातील मृत्यूचे प्रमाण 1.85% आहे. मुंबई सर्कलमध्ये मुंबई महानगरपालिका , ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका, पालघर, वसई-विरार महानगरपालिका, रायगड, पनवेल महानगरपालिका या क्षेत्रात 2603 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.