Monsoon Update  Saam Tv
देश विदेश

India Monsoon Update: प्रतीक्षा वाढली! मान्सूनचा प्रवास लांबला, केरळमध्ये 3 ते 4 दिवस उशिराने दाखल होणार

Maharashtra Monsoon: मान्सून केरळमध्ये उशिराने दाखल होणार असल्यामुळे तो महाराष्ट्रात देखील उशिराने दाखल होणार आहे.

Priya More

India Monsoon Update : देशातील जनता उकाड्यामुळे हैराण झाली आहे. अशामध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. मधून अधून पडणारा पाऊस आणि कडक ऊन यामुळे गरमी प्रचंड वाढली आहे. सर्वजण मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. आता मान्सूनबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. यंदा मान्सून (Monsoon 2023) लांबला आहे. मान्सून लांबल्यामुळे त्याची केरळमध्ये (Monsoon In Kerala) दाखल होण्याची तारीख देखील पुढे ढकलली गेली आहे.

मान्सूनचा अंदाज चूकला -

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून तीन ते चार दिवस उशीराने दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून केरळमध्ये 4 जूनपर्यंत दाखल होऊ शकतो. मान्सून केरळमध्ये रविवारी दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण तो अंदाज चूकला कारण मान्सून अद्याप केरळमध्ये दाखल झाला नाही. मान्सून केरळमध्ये उशिराने दाखल होणार असल्यामुळे तो महाराष्ट्रात देखील उशिराने दाखल होणार आहे.

अशी आहे मान्सूची सध्य स्थिती -

हवामान खात्याने मान्सूनबद्दल पुढे सांगितले, दक्षिण-पश्चिम मान्सून आता लक्षद्विपपर्यंत पोहोचला आहे. केरळमध्ये मान्सून तीन ते चार दिवस उशिराने येण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्रावरील पश्चिमेकडील वाऱ्यांच्या वाढीमुळे परिस्थिती अनुकूल होत आहे. त्यासोबतच पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली हळूहळू वाढत आहे. 4 जून रोजी पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली सरासरी समुद्रसपाटीपासून 2.1 किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. आग्नेय अरबी समुद्रावरील ढगांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे पुढच्या तीन-चार दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

बळीराजाला करावी लागणार प्रतीक्षा -

हवामान खात्याने मान्सून 4 जूनला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर हळूहळू मान्सून पुढे सरकरत महाराष्ट्रात 10 जून रोजी पोहण्याचा अंदाज वर्तवला होता. पण आता मान्सून तीन ते चार दिवस उशिराने येणार असल्यामुळे तो महाराष्ट्रात देखील उशिरा दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मान्सूची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसंच आणखी थोडे दिवस नागरिकांना उकाडा सहन करावा लागणार आहे.

मागच्या वर्षी या दिवशी दाखल झाला -

दरम्यान, 2018 मध्ये मान्सून 29 मे रोजी (Monsoon) म्हणजेच वेळेत केरळमध्ये दाखल झाला होता. 2019 मध्ये 8 जून रोजी दाखल झाला होता. 2020 मध्ये 1 जूनला दाखल झाला होता. 2021 मध्ये 3 जून रोजी दाखल झाला होता. तर 2022 मध्ये म्हणजे 29 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता. यावेळी मान्सूला दाखल होण्यासाठी खूपच वेळ झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

SCROLL FOR NEXT