Rahul Gandhi on Modi Government: ओडिशातील रेल्वे अपघातावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तुम्ही मोदी सरकारला विचारा रेल्वे अपघात का झाला? ते म्हणतील काँग्रेसने हे 50 वर्षांपूर्वी केलं होत. ओडिशात शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)
राहुल गांधी (Rahul Gandhi) एका आठवड्याच्या अमेरिका (America) दौऱ्यावर आहेत. ते इथल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. सोमवारी त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील जनतेला संबोधित केले. यावेळी राहुल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांना विचारा की तुम्ही पाठ्यपुस्तकातून पीरियोडिक टेबल का काढला? ते लगेच म्हणतील की काँग्रेसने हे काम 60 वर्षांपूर्वी केलं होत. (Political News)
पुढे राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारला काहीही विचार ते लगेच उत्तर देणार की काँग्रेसने केलं. तुम्ही सर्व कारने इथे आला आहात. कल्पना करा की कार चालवताना तुम्ही फक्त मागील आरशात पाहिले तर काय होईल? तुम्ही गाडी चालवू शकाल का? एकामागून एक अपघात होणार. प्रवासी तुम्हाला विचारतील तुम्ही काय करत आहात? असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर यांच्यावर टीका केली आहे.
"पीएम मोदी मागे वळून कार चालवत आहेत"
राहुल गांधी पुढे म्हणाले, ही पंतप्रधान मोदींची विचारसरणी आहे. त्यांना भारताची गाडी चालवायची आहे, पण ते फक्त मागे वळून पाहतात. गाडी पुढे का सरकत नाही, पुन्हा पुन्हा का धक्के मारत आहे, याचा विचार त्यांना करता येत नाही. ही भाजप (BJP) आणि संघाची विचारसरणी आहे, असं देखील ते म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.