India Vs Pakistan Saam Tv
देश विदेश

India Vs Pakistan: ऑपरेशन सिंदूरनंतर 'ऑपरेशन केलर', पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडच्या साथीदाराचा खात्मा

India Launches 'Operation Keller' After 'Sindoor': ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने ऑपरेशन केलर सुरू केले आहे. हे ऑपरेशन केलर म्हणजे काय? ते घ्या जाणून...

Priya More

सुप्रीम मसकर साम टीव्ही न्यूज

दहशतवाद्यांचा ऑल आऊट खात्मा करण्यासाठी भारतानं नवं मिशन हाती घेतलं आहे. त्या मिशनच्या सुरूवातीला भारताला मोठं यश मिळालंय. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतरचं सुरु केलेलं ऑपरेशन केलर नेमकं काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

पहलगाम हल्ल्यानंतर राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आता भारतीय लष्करानं ऑपरेशन केलर सुरु केलय. त्यामुळे पाकमधील दहशतवाद्यांचा भीतीनं थराकाप उडालाय. भारतीय लष्कर दहशतवाद्यांना शोधून शोधून ठेचतयं. अशातच जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

शाहिद अहमद कुट्टेय -

लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेटर

भाजप सरपंच हत्या प्रकरणात सहभाग

कुलगाममध्ये टेरिटोरियल आर्मीच्या सैनिकाची हत्या

पहलगामचा मास्टरमाईंड हाशिम मुसाचा निकटवर्तीय आहे.

हारिस नसीर -

शोपियानमधील शुकरू जंगलात एनकाऊंटर

हारिस नसीर हा पुलवामामधील रहिवाशी आहे.

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे.

अदनान शफी दार -

लष्कर-ए-तोयबा आणि TRF चा दहशतवादी आहे.

अदनान शफी दार हा शोपियानमधील रहिवाशी आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील सुरक्षा दल हाय अलर्टवर आहे. तिथल्या हालचालीवर लक्ष ठेवून दहशतवाद्यांचा नांग्या ठेचण्याची रणनिती लष्करानं आखलीय. त्यामुळे ऑपरेशन केलर दहशतवादाच्या मूळावर शेवटचा घाव घालून दहशतवाद्यांचा ऑल आऊट सफाया करेल, हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Isha Malviya: शेकी गर्ल ईशा मालवीयाचा नवा एथनिक लूक पाहिलात का?

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाच्या अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

Heart Attack Prevention: हार्ट अटॅक अन् स्ट्रोक 'या' चुकांमुळे होतो, उपाय वेळीच जाणून घ्या, नाहीतर...

Maharashtra Live News Update : - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर

Diwali Lucky Rashi: दिवाळीत 'या' राशींची होणार चांदी, खिशा पैशांनी भरणार

SCROLL FOR NEXT