Digital Strike Saam
देश विदेश

Pahalgam Attack: भारत सरकारकडून 'करारा जवाब'; पाकिस्तानविरोधात केला डिजिटल स्ट्राइक

Indian government has taken decisive action against Pakistan: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

Bhagyashree Kamble

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानविरोधात डिजीटल स्ट्राइक सुरू केला आहे. भारताने पाकिस्तान सरकारच्या अधिकृत सोशल मीडिया X (ट्विटर) अकाउंटवर बंदी घातली आहे. पाकिस्तानचे अकाऊंट आता भारतात अॅक्सेस करता येणार नाही आहे.

सीसीएस बैठकीत घेण्यात आले काही निर्णय

मंगळवारी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानविरोधात ५ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये,

-अटारी सीमा बंद.

-सिंधू पाणी करार थांबवला.

-डिजिटल स्ट्राइक - पाकिस्तान सरकारचे एक्स अकाउंट बंद.

-अंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानविरोधात मोहिम.

-पाकिस्तानी नागरिकांना भारतात व्हिसाद्वारे प्रवास करण्याची बंदी.

-पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी ४८ तासांचा कालावधी.

पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण

भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवारी नेमकं काय घडलं?

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार करून अनेक निष्पाप भारतीयांचा जीव घेतला. २२ एप्रिलला अचानक दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यात २८ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर भारताने देखील पाकिस्तानविरोधात ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT