Gita Gopinath saam tv
देश विदेश

जग मंदीच्या लाटेवर, पण भारत सर्वात 'बेस्ट'; IMF म्हणतेय, टेन्शन घेऊ नका!

गेल्या काही दिवसांपासून स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचाची परिषद सुरू आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचाची (World economic Forum) परिषद सुरू आहे. या परिषदेत जगावर कोसळलेल्या आर्थिक संकटांबाबत विविध अर्थतज्ज्ञांकडून चर्चा करण्यात येत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेच्या (IMF) मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ (Gita Gopinath) यांनी माध्यमांशी बोलताना महत्वाचं वक्तव्य केलं आहे. महागाईच्या (Inflation) संकटाचा फटका भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला बसला आहे. परंतु, भारताची स्थिती इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे, असं मत गोपीनाथ यांनी परिषदेत माध्यमांशी बोलनाता व्यक्त केलं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना गोपीनाथ पुढे म्हणाल्या, भारतात गेल्या तीन महिन्यांपासून किरकोळ महागाई निर्देशांक वाढला आहे. परंतु, इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती चांगली आहे. भारताची (India) वित्तीय स्थितीही अन्य देशांच्या तुलनेत उत्तम आहे. काही देशांमध्ये तर मंदीचं संकटही येवू शकतं, पण भारताला याबाबत चिंता करण्याची गरज नाहिये.

विदेशी गंगाजळीत वाढतीच

आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गोपीनाथ यांनी म्हटलं की, भारतातकडे पर्यायी विदेशी गंगाजळीत आहे. जीएसटीसह अन्य करप्राप्तीही चांगली आहे. कोणतीही आपातकालीन स्थिती उद्धवल्यास आरबीआयकडे ६०० अब्ज डॉलर्सची विदेशी जळजळीत उपलब्ध आहे. त्यामुळे भारताकडे महागाईच्या संकटाचा आणि मंदीचा सामना करण्यासाठी पर्याय आहेत.

पियुष गोयल यांचं आवाहन

वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दावोसमध्ये आवाहन केलं की, देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या महागाईच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी जगातील कॉर्पोरेट क्षेत्रानेही भारताला पाठींबा दिला पाहिजे. आरबीआय आणि भारत सरकार महागाईच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे निर्णय घेत आहे. परंतु, व्याजदर वाढवल्याने विकास दर प्रभावित होईल. त्यामुळे कॉर्पोरेट जगाने भारत सरकारला पाठिंबा दिला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

Hair Care: हेल्दी आणि शायनी केस हवेत? मग 'हा' पदार्थ नक्की ट्राय करा, आठवड्याभरात दिसेल फरक

Fodnicha Bhat Recipe : ऑफिसवरून आल्यावर झटपट बनवा 'असा' चटपटीत फोडणीचा भात, आवडीने खातील सगळे

Gold Price: मागच्या वर्षीचा सोन्याचा दर काय होता?

Bihar Election : निवडणकीआधीच मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; फायरब्रँड नेता पक्षाला रामराम ठोकणार

SCROLL FOR NEXT