सोशल मीडियाद्वारे अतिरेक्यांच्या संपर्कात; पुण्यात ATSने अटक केलेला युवक मूळचा बुलडाण्याचा

जुनेद मोहम्मद असं अटक केलेल्या तरुणाचे नाव असून एटीएसने या आरोपी तरुणाला आज न्यायालयात हजर केलं होतं.
ATS Pune News, Pune Latest News in Marathi, Pune Crime News
ATS Pune News, Pune Latest News in Marathi, Pune Crime NewsSaam TV
Published On

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : सोशल मीडियाद्वारे "लष्कर ए तोयबा" च्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला एटीएसने पुण्यातून अटक केल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. अतिरेकी संघटनाना (Terrorist) अर्थपुरवठा करण्याच्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे दहशतवादी विरोधी पथकाने दापोडी परिसरातून एका तरुणाला अटक केली होती. (Pune Latest News in Marathi)

जुनेद मोहम्मद (Junaid Mohammed) असं अटक केलेल्या तरुणाचे नाव असून एटीएसने या आरोपी तरुणाला आज न्यायालयात हजर केलं असता, न्यालयाने त्याला ३ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. आरोपी जुनेद मोहम्मद हा समाजमध्यमाद्वारे (Social Media) काश्मीरमधील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. महिन्याभरापूर्वी जुनेदच्या बँक खात्यात पैसे जमा झाले तसंच तो दहशतवादी संघटनेच्या अधिक संपर्कात येत असल्याची माहिती पुणे ATS ला मिळाली होती.

हे देखील पाहा -

त्यानुसार सोमवारीपासून त्याची चौकशी सुरू होती या चौकशीत दोषी आढळल्याने त्याच्याविरुद्ध सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. मूळचा बुलढाणा (Buldhana District) जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी असलेला तरूण मागील दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. या तरुणाने शस्त्र खरेदी करण्यासाठी फंडिंग गोळा केल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने काही मोठा कट रचला गेलाय का याचा तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, यापुर्वी देखील पुण्यातून "टेरर फंडिंग" प्रकरणी एकाला अटक झाली होती. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानमधून येणारा पैसा (Terror funding) भारताच्या वेगवेगळ्या भागात पोचविणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीप्रमुख रमेश शहा (वय 28, रा.गोपालगंज, बिहार) यास महाराष्ट्र व उत्तर प्रदेश "एटीएस'ने फेब्रुवारी २०१९ मध्ये पुण्यातून अटक केली होती. पोलिसांच्या भीतीने त्याने उत्तर प्रदेशमधून पलायन करून पुण्यात वास्तव्य केले होते. तो नेटकॉलींगद्वारे दहशतवाद्यांच्या हॅंडलरशी संपर्कात होता. त्यांच्याकडून मिळणारे पैसे तो देशातील विविध राज्यात दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी पोचवीत होता अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com