INDIA INFLATION ALERT saam tv
देश विदेश

सर्वसामान्यांना महागाईचा डबल झटका? खाद्यपदार्थांसह पेट्रोल-डिझेलही महागणार? सरकारने दिला मोठा इशारा

Government Issues Inflation Warning: देशातील सर्वसामान्यांना आगामी काही महिन्यांत महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामानातील बदल, खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यातील अनिश्चितता आणि लग्नसराईचा हंगाम यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढू शकतात.

Omkar Sonawane

देशातील सर्वसामान्य नागरिकांना आगामी काही महिन्यांत पुन्हा एकदा महागाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने याबाबत आधीच इशारा दिला आहे. हवामानातील बदल, खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यातील अनिश्चितता आणि लग्नसराईचा हंगाम या तीन प्रमुख कारणांमुळे महागाई वाढण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे. याचा परिणाम खाद्यपदार्थापासून पेट्रोल-डिझेलपर्यंतच्या किमतीवर होऊ शकतो.

केंद्र सरकारने शनिवारी मासिक आर्थिक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, नोव्हेंबरनंतरच्या आगामी काही महिन्यांत महागाईचा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली नरमाई आणि रुपयातील मजबुती यामुळे महागाई काही प्रमाणात नियंत्रित राहू शकते. यंदा देशात नोव्हेंबरपर्यंत सणांचा उत्साह कायम होता. त्यातच आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात बाजारात खाद्यपदार्थांसह कपडे, घरगुती वस्तू आणि इतर जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची मागणी वाढते.

मागणीत वाढ झाल्याने या वस्तूंच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः खाद्यपदार्थांच्या दरांवर याचा परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर हवामानातील अनिश्चिततेमुळे कृषी उत्पादन आणि बाजारपेठेपर्यंत वस्तू पोहोचवण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात. परिणामी, पुरवठा कमी झाल्यास वस्तूंच्या किमती आणखी वाढू शकतात. देशातील महागाईचा आणखी एक मोठा धोका आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित आहे. मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणि समुद्री मार्गाने होणाऱ्या मालवाहतुकीच्या खर्चात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

एकीकडे खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता, तर दुसरीकडे इंधन आणि वाहतूक खर्चातील वाढीचा धोका यामुळे आगामी काही महिने सर्वसामान्यांसाठी महागाईच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Health : पीरियड्स अनियमित असतील तर रोजच्या या ५ चुका टाळा; PCOS चा त्रास वाढू शकतो

एकाच टोळीत वावरले, नंतर बनले दुश्मन; आकाश गवईचा रक्तरंजित शेवट

Kalyan News : सासूच्या भांडणाचा जाब विचारल्याचा राग अनावर झाला; पाय फ्रॅक्चर होईपर्यंत जावयाला मारहाण

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळींच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले! उपचारांसह मुलांच्या शिक्षणाचीही घेतली जबाबदारी

Eye Care Tips : डोळ्यांची दृष्टी नकळत होतेय कमजोर? रोजच्या या ८ सवयी असू शकतात कारण, वेळीच सावध व्हा

SCROLL FOR NEXT