चीनसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान भारताने LAC वर आपली ताकद वाढवली Twitter/ @ANI
देश विदेश

चीनसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान भारताने LAC वर आपली ताकद वाढवली

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चीनच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी भारतानेही आपली तयारी वाढवली आहे.

वृत्तसंस्था

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चीनच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी भारतानेही आपली तयारी वाढवली आहे. चीनी लष्कराला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने K-9 ऑटोमॅटिक होवित्झर रेजिमेंट पूर्व लडाखच्या पुढच्या भागात तैनात केली आहे. ही तोफा सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या शत्रूच्या स्थानांवर हल्ला करण्यास सक्षम आहे. K -9 वज्र तोफा तैनात करण्याबाबत लष्करप्रमुख म्हणाले की, या तोफा उच्च उंचीच्या भागातही काम करू शकतात. त्याच्या क्षेत्रीय चाचण्या अत्यंत यशस्वी झाल्या आहेत. आम्ही आता एक संपूर्ण रेजिमेंट तैनात केली आहे, जी खरोखर उपयुक्त ठरणार आहे.

लष्करप्रमुख एमएम नरवणे म्हटले की, ''भारत-चीन सीमेवर गेल्या ६ महिन्यांपासून परिस्थिती अगदी सामान्य आहे. आमची ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात चर्चेची 13 वी फेरी होईल अशी आशा आहे आणि विघटन कसे होईल यावर आम्ही एकमत करू. लष्करप्रमुखांनी असेही नमूद केले की चीनने संपूर्ण पूर्व लडाख आणि उत्तर मोर्च्यामध्ये आमच्या पूर्व कमांडपर्यंत मोठ्या संख्येने सैन्य तैनात केले आहे. निश्चितपणे पुढच्या भागात चिनेन सैन्य वाढवले आहे, त्यामुळे तो आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे.

लष्करप्रमुख म्हणाले की आम्ही नियमितपणे चीनच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. आम्हाला मिळालेल्या इनपुटच्या आधारे, आम्ही पायाभूत सुविधा तसेच सैन्याच्या बाबतीत समान विकास करत आहोत, जे कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी आवश्यक आहेत. तूर्तास, आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोनाळ्यात चौथ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू...

Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची चौकशी, ४ तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

Ex गर्लफ्रेंडसोबत मरायचा प्लान आखला, कारमध्ये बसून बॉम्बस्फोट केला, तरुण जिवंत जळाला अन्..;

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतील 'या' 5 टिकली डिझाईन्स; प्रत्येक महिलेने आजच ट्राय करा

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

SCROLL FOR NEXT