ड्रग्स पार्टीवर NCBचा छापा, 10 जण ताब्यात; 1 सुपरस्टारचा मुलगा?
ड्रग्स पार्टीवर NCBचा छापा, 10 जण ताब्यात; 1 सुपरस्टारचा मुलगा? Saam TV

ड्रग्स पार्टीवर NCBचा छापा, 10 जण ताब्यात; 1 सुपरस्टारचा मुलगा?

बॉलीवूडच्या एका सुपरस्टारच्या मुलाचा समावेश असल्याचे एनसीबीच्या सुत्रांनी सांगीतले आहे.
Published on

मुंबई (Mumbai) समुद्रकिनाजवळ क्रूजवर (Cruz Party) सुरु असलेल्या पार्टीवर एनसीबीने (NCB) छापा टाकत, मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा (Drugs) साठा जप्त केल्याचे एनसीबी सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. हे जहाज मुंबईवरुन गोव्याकडे (Goa) चालले होते, भर समुद्रात एनसीबीने छापा या पार्टीवर छापा टाकला आहे. या जहाजामध्ये दबा धरुन बसलेल्या एनसीबीचे झोनल अधिकारी समिर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यामध्ये बॉलीवूडच्या एका सुपरस्टारच्या मुलाचा समावेश असल्याचे एनसीबीच्या सुत्रांनी सांगीतले आहे.

मुंबई बंदरातून हे क्रूज जहाज गोव्याच्या दिशेने चालले होते. मुंबई बंदर सोडून दोन तास उलटल्यावर या जहाजावर पार्टी सुरु झाली. ही ड्रग पार्टी सुरु होताच, जहाजावर दबा धरुन बसलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पार्टी उधळून लावली. या छाप्यात कोकेन, हशीश. मेफेड्रोन आणि एमडीएमए सारखया ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. या सर्व प्रकरणात उशीरापर्यंत कारवाई सुरु होती तर यातून एक मोठ ड्रग रॅकेट समोर येण्याची शक्यता असल्याचं एनसीबीच्या सुत्रांनी सांगीतलं आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांना मुंबईत आणल गेलं आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com