India-Pakistan Tensions Saam tv
देश विदेश

Pahalgam Attack : भारताचं ऑपरेशन पीओके? पाकड्यांचे नापाक इरादे भुईसपाट होणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

India-Pakistan Tensions : भारताने आता मिशन बदला सुरु केलंय.. त्यातच पाकड्यांना धुळीस मिळवण्याचा फुलप्रुफ प्लॅन भारताने केलाय.. हा प्लॅन काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये....

Bharat Mohalkar

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकड्यांच्या नापाक कारनाम्याचा भांडाफोड झालाय... पाकड्यांनी पाकव्याप्त काश्मीरला दहशतवाद्यांचा अड्डा बनवल्याचं समोर आलंय...मात्र याच दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी भारताने फुलप्रुफ प्लॅन बनवलाय...एलओसीच्या पहिल्या टप्प्यात हेवी आर्टिलरी, सर्विलेंस आणि रडार सिस्टीम तैनात करण्यात आलीय..तर दहशतवाद्यांचे मुळं उखडून टाकण्यासाठी आणि क्रॉस बॉर्डर स्ट्राईकसाठी भारताने स्पेशल टीम तयार केलीय.. मात्र दहशतवाद्यांचे गड नेमकं कुठं आहेत? पाहूयात...

POK दहशतवाद्यांचा अड्डा

रावलकोटमध्ये लष्कर-ए-तैयबा, जैश आणि हिजबुलचे दहशतवादी कॅम्प

मुजप्फराबादमध्ये 10 दहशतवादी कॅम्प, यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी सक्रीय

कोटलीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टेरर कॅम्प

उत्तरी पीर पंजालमध्ये 10 आतंकी कॅम्प, यात 50-60 दहशतवादी अॅक्टिव्ह

दक्षिणी पीर पंजालच्या 35 दहशतवादी कॅम्पमध्ये 70 दहशतवाद्यांना प्रशिक्षण

पाकिस्तानमध्ये 37 दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड आहेत. त्यापैकी 20 लॉन्चपॅड पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याची माहिती सुरक्षा एजेन्सीच्या हाती लागलीय.. तर पाकिस्तानमधील मुजफ्फराबादच्या अदब याजिद कॅम्पमध्ये पाकिस्तानी आर्मीने ट्रेनिंग दिल्याचं समोर आलंय.. यातूनच पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यात आला..

पाक सैन्याकडून रावलकोटमध्ये दहशतवाद्यांचं संमेलन

जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबासह 15 संघटनांचे कमांडर सहभागी

मसूद अझहरने पहलगाम हल्ल्यासाठी दिली चिथावणी

नदीच्या आडून

पाकिस्तान आर्मीच्या एसएसजी टीमकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण

प्रशिक्षण दिलेले 130 दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रीय

याच कुरापतखोर पाकड्यांना धडा शिकवण्याचा इशारा पंतप्रधान मोदींनी दिलाय..

आता दहशतवाद्यांचे कॅम्प उध्वस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करुन चालणार नाही... कारण पाकिस्तानचं लष्कर हाच दहशतवाद्यांचा आका आहे... त्यामुळेच या दहशतवादाच्या रावणाला भस्म करुन भारताने पाकड्यांचा माज उतरवायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT