Indian Air Force saam tv
देश विदेश

India Pakistan Tension: कुरापतखोर पाकच्या ठेचल्या नांग्या उद्ध्वस्त पाकचे 'हे घ्या पुरावे' सैन्यदलाने फाडला पाकचा बुरखा

Proof Unveiled: पाकच्या कुरापतींना भारतानं तडाखेबाज उत्तर दिलं.. मात्र आमचं नुकसान झालंच नसल्याच्या बतावण्या पाक मारत होता... अखेर भारतानं पुरावे दाखवून पाकचा बुरखाच टराटरा फाडलाय... त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट....

Saam Tv

याच धमाक्यांनी पाकिस्तान बिथरला... आतून, बाहेरुन हादरला... भारताच्या प्रत्युत्तरानं थरथर कापू लागला... यात पाकचं नाक कापलं गेलं... त्यानंतरही पाकिस्तानी नेते बड्या बड्या बाता मारताना दिसले... भारतानं पाकिस्तानमधील फक्त दहशतवादी तळच नाही तर हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली... मात्र पाकच्या हल्ल्यात भारताचंच नुकसान झालं... आमचं नुकसानच झालं नाही, अशा बतावण्या पाकिस्तानने सुरु केल्या... त्यामुळेच भारतीय सैन्यदलानं थेट पाकिस्तानच्या काळ्या कारनाम्यांसह उद्ध्वस्त केलेल्या एअरबेसचे पुरावेच सादर केले....

हा पाहा पुरावा... भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ बेचिराख करुन 100 पेक्षा दहशतवाद्यांचा खात्मा केला...

मात्र पाकने पुन्हा भारताची कुरापत काढत ड्रोन हल्ले केले.. त्याचा बदला भारतानं थेट पाकिस्तानचे 11 एअरबेस उद्ध्वस्त करुन घेतलाय.... भारतानं नूर खान एअऱबेस, रफिकी एअऱबेस, मुरीद एअरबेस, सुक्कुर एअरबेस, सियालकोट एअरबेस, पसरुर एअरबेस, चुनियन एअरबेस, सरगोधा एअरबेस, स्कर्दू एअरबेस, भोलारी आणि जकोबाबाद ही लष्करी हवाई तळं उद्ध्वस्त केले.....

पहलगाम हल्ल्यानंतर तो मी नव्हेच, अशी भूमिका घेणारा पाक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचे पुरावे जारी करताच तोंडघशी पडलाय.. एवढंच नाही तर पाकिस्तानी लोकांना बुमरँग करण्याचा पाकनं प्रयत्न केला.. मात्र भारताकडून कसा सपाटून मार खाल्लाय त्याचे पुरावे समोर आल्यानं पाकचा बुरखा टराटरा फाटलाय.... आतातरी पाकनं पोकळ बाता मारणं सोडून द्यायला हवं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT