रोहित कदम, साम टीव्ही
इतिहासात पहिल्यांदाच भारतानं आपली अण्वस्त्रं थेट लष्करी तळांवर तैनात केल्यानं शत्रूराष्ट्रांत खळबळ उडालीये. भारतानं शांततेच्या काळात प्रथमच 12 अण्वस्त्रं तैनात केल्याचा दावा स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे 'सिप्री'नं आपल्या अहवालात केला आहे.
भारताची ताकद वाढली, जगाला धडकी
- शांततेच्या काळात भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्र तैनात
- भारताचा एकूण अण्वस्त्रसाठा 190वर पोहोचला
- अण्वस्त्र थेट क्षेपणास्त्रांना जोडून लष्करी तळांवर सज्ज
- सागरी अण्वस्त्र क्षमता वाढल्यानं जगाला धडकी
तर दुसरीकडे, चीनही आपल्याकडील अण्वस्त्रसाठा वेगानं वाढवतोय. चीन दरवर्षी जवळपास 100 अण्वस्त्रं बनवत असून 2035 पर्यंत त्याचा साठा 1500 पर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज सिप्रीनं व्यक्त केलाय. दरम्यान, चीनकडून अण्वस्त्रनिर्मिती केली जात असली तरी जगातील मोठ्या देशांमध्ये काय स्थिती आहे पाहा...
अमेरिकेत 1770, रशियात 1796, चीन 24, भारत 12 तर पाकिस्तानात शून्य अण्वस्त्रं तैनात करण्यात आली आहेत
अमेरिकेत 5042, रशियात 5420, चीन 620, भारत 190 तर पाकिस्तानात 170 एकूण अण्वस्त्रसाठा आहेत
सिप्री'चा अहवाल म्हणजे भारताच्या बदलत्या आक्रमक परराष्ट्र आणि लष्करी धोरणावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच म्हणावे लागेल. अशावेळी भारताची नजर आता केवळ पाकिस्तानपुरती मर्यादित नसून चीनकडेही केंद्रित होत असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे पुढील काळात भारताच्या शांततेच्या भूमिकेला कमकुवतपणा समजणाऱ्या शत्रूंना आता नक्कीच धडकी भरली असणार..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.