India Corona Update
India Corona Update Saam Tv
देश विदेश

India Corona Update: कोरोनाची गती मंदावली, तब्बल महिनाभरानंतर 1 लाखाहून कमी नवे रुग्ण

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याची स्थिती आहे. आज तब्बल महिन्याभरानंतर नव्या रुग्णांची संख्या ही 1 लाखांहून कमी आढळून आली आहे. त्यामुळे कोरोनाची गती मंदावल्याचं चित्र आहे. गेल्या 48 तासांच्या तुलनेत आज देशात कोरोना विषाणूच्या साथीच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे (India Corona update virus speed get slow the country reports 83876 new cases in the last 24 hours).

भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona Cases) 83,876 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एक दिवसाआधी रविवारी 1 लाख 7 हजार 474 नवे रुग्ण आढळले होते. देशातील पॉझिटीव्हीटी रेट (Positivity Rate) 7.25% आहे.

भारतात (India) गेल्या 24 तासात कोरोनातून सुमारे दोन लाख लोक बरे झाले. त्याचप्रमाणे देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 895 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचे (Corona Virus) नवीन रुग्ण एक लाखापेक्षा कमी असताना जवळपास महिनाभरानंतर इतके कमी रुग्ण दिसून येत आहेत. दुसरीकडे, एकूण संक्रमित रूग्णांच्या तुलनेत सक्रिय रुग्ण (Active Cases) संख्या केवळ 2.62 टक्के इतकी आहेत.

एकूण सक्रिय प्रकरणे: 11,08,938

एकूण मृतांची संख्या: 5,02,874

169 कोटींहून अधिक लसीकरण

देशातील लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 169 कोटींहून अधिक अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 45 लाख 10 हजार 770 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 169 कोटी 63 लाख 80 हजार 755 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

Sangli News: पैज लावाल तर तुरुंगात जाल! निकालावरुन पैज लावणं अंगलट आलं, सांगलीत दोन मित्रांच्या गाड्याही जप्त

Anti Diet Plan म्हणजे काय? कोणासाठी आहे फायदेशीर

SCROLL FOR NEXT