India corona update
India corona update SAAM TV
देश विदेश

देशात कोरोनाचा वेग वाढला; 24 तासांत आढळली मोठी रुग्णसंख्या, 28 मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची (Corona) संख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दिवसागणिक सातत्याने 15 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासनासमोरील अडचणी वाढताहेत. सोमवारी देशात कोरोनाचे 16 हजार नवे रुग्ण (Corona Cases) आढळून आले होते. मंगळवारी सुद्धा देशात तब्बल देशात 16 हजार 159 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Corona Cases In India)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात मंगळवारी दिवसभरात कोरोनामुळे 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 5 लाख 25 हजार 270 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत 15 हजार 394 रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे.

दरम्यान, मंगळवारी नव्याने आढळून आलेल्या बाधित रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची सक्रिय संख्या आता 1,15,212 वर पोहोचली आहे. दुसरीकडे देशातील कोरोना सकारात्मकता दर 3.56 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 15 हजार 394 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (Corona Latest Updates)

198 कोटी नागरिकांचे लसीकरण

देशव्यापी लसीकरण मोहिमेत 198 कोटीं लसींचा टप्पा पार करण्यात आला आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून देशात आतापर्यंत 4 कोटी 35 लाख 47 हजार 809 लोकांना कोरोनाची लागण झाली. यापैकी 4 कोटी 7 हजार 327 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 5 लाख 25 हजार 270 रुग्णांचा मृत्यू झाला. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत कोरोना लसीचे 198 कोटी 20 लाख 86 हजार 763 डोस देण्यात आले आहेत

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE Board 10th Result 2024: CBSE १० वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; परीक्षेचा निकाल जाहीर

Maharashtrian Dish: झणझणीत! तोंडाला पाणी सुटेल असा मिरचीचा ठेचा

Gharoghari Matichya Chuli : 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतील विवाहसोहळ्यात पैठणीची थीम; कलाकारांनी दिली पारंपरिक पोशाखाला पसंती

Maharashtra Election Voting LIVE : नंदुरबारमध्ये विक्रमी मतदान होण्याची शक्यता; १ वाजेपर्यंत ३७.३३ टक्के मतदान

Chhatrapati Sambhajinagar News: केवळ एका मतासाठी; पठ्ठ्याने दुबईवरून थेट संभाजीनगर गाठलं, हजारो किमीचा प्रवास

SCROLL FOR NEXT