India Corona Update Saam Tv
देश विदेश

India Corona Update: देशातील कोरोना रुग्णसंख्येत 19.6 टक्क्यांची घट; 27,409 नवीन रुग्णांची नोंद

तर एकूण 347 लोकांचा मृत्यू झाला आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतातील कोरोना व्हायरसचा (Corona) वेग आता मंदावला आहे. आकडेवारीनुसार. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 27 हजार 409 नवीन रुग्ण आढळले आहेत. या प्रकरणांवरून हे स्पष्ट झाले आहे की कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 19.6 टक्के घट झाली आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या 4 कोटी 26 लाख 65 हजार 534 झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry Of Health) सांगितले की, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसमुळे 347 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 27 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर 82,817 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 4,23,127 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. या धोकादायक व्हायरसमुळे 5,09,358 लोकांचा मृत्यू झाला आहे.

त्याच वेळी, देशातील लसीकरणांची संख्या 1,73,42,62,440 वर पोहोचली आहे. यापूर्वी, 31 डिसेंबर 2021 रोजी देशात कोरोनाचे 22,775 नवीन रुग्ण आणि 1 जानेवारी 2022 रोजी 27,553 नवीन रुग्ण आढळले होते. देशातील कोरोनाचा बरा होण्याचा दर 97.82 टक्के झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुण्यातल्या नवले ब्रिजवर दोन चारचाकी वाहनांचा अपघात; ३ जण गंभीर जखमी

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT