भारतानं अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी घुसखोरी उधळली: चिनी सैनिकांना घेतलं ताब्यात  Saam Tv
देश विदेश

भारतानं अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी घुसखोरी उधळली: चिनी सैनिकांना घेतलं ताब्यात

चीनच्या सैनिकांनी पुन्हा एकदा भारताच्या हद्दीत घुसण्याचे धाडस केलं आहे

विहंग ठाकूर

वृत्तसंस्था : चीनच्या सैनिकांनी पुन्हा एकदा भारताच्या हद्दीत घुसण्याचे धाडस केलं आहे. मात्र, भारतीय सैन्यानं चीनच्या सैनिकांचा प्लॅन उधळून लावून त्यांच्या काही सैनिकांना ताब्यात घेतलं आहे. चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये घुसून भारतीय सीमेवरील रिकाम्या बंकरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती समोर आली आहे. चीनच्या सुमारे 200 सैनिकांनी भारतीय सीमेच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.

हे देखील पहा-

मात्र, भारतीय सैनिकांनी चीन सैनिकांचा हा प्लॅन उधळून लावत त्यांना हाकलून लावलं आहे. ही घटना मागील आठवड्यात बुमला आणि यांग्त्से बॉर्डर जवळच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ  घडली असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चिनी सैनिकांनी सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. ज्याला भारतीय सैनिकांनी तीव्र विरोध करत काही चीनी सैनिकांना तात्पुरते ताब्यात घेतले आहे. भारत- चीन सीमा अद्याप औपचारिकरित्या विभागण्यात आली नाही. याच कारणामुळे सीमेबाबत दोन्ही देशात वाद आहे.

मात्र, दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता राखण्याकरिता अनेक करार करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देश आपल्या सीमा लक्षात घेऊन गस्त घालत राहत असतात. बऱ्याच वेळा असे घडते की जेव्हा दोन्ही देशांचे सैनिक एकावेळी एकाच ठिकाणी पोहोचतात तेव्हा दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये तणावाचे वातावरण वाढत असते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mental Health: सकाळी उठल्यावर 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नका, दिवसभर आळस अन् ताण येईल

Maharashtra Elections Result Live Update : पुण्यात भाजपचे चौथे पॅनल विजयी, सर्व महिला उमेदवार जिंकल्या

Love Story: मुलगा हमाली करतो म्हणून नकार,आज आहे सुखी संसार; अशी आहे बिग बॉस फेम रोशन भजनकरची फिल्मी लव्हस्टोरी

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादववर आरोप करणं पडलं महागात; 'त्या' अभिनेत्रीवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

अजित पवारांना मोठा धक्का, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 74 उमेदवार आघाडीवर |VIDEO

SCROLL FOR NEXT